नांदेड - आसना नदीच्या प्रवाहात बुडालेल्या तरुणांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करणार
नांदेड, 4 ऑक्टोबर (हिं.स.) आसना नदीला पूर आल्यामुळे पाण्याच्या प्रवाहामध्ये बुडून मृत्यू झालेल्या नांदेड जिल्ह्यातील तरुणांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाठपुरावा करणार असल्याचे लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे
अ


नांदेड, 4 ऑक्टोबर (हिं.स.) आसना नदीला पूर आल्यामुळे पाण्याच्या प्रवाहामध्ये बुडून मृत्यू झालेल्या नांदेड जिल्ह्यातील तरुणांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाठपुरावा करणार असल्याचे लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज सांगितले आहे.

श्री गणेश विसर्जनाच्या दिवशी गाडेगाव ता.जि. नांदेड येथील आसना नदी पुलावरून श्री गणेशाचे विसर्जन करताना योगेश उबाळे व बालाजी उबाळे हे 2 तरुण आसना नदीला पूर आल्यामुळे पाण्याच्या प्रवाहामध्ये बुडून मृत्यू झाला तसेच यांच्यासोबत एका मुलाचा शोध लागला नाही. आज त्यांनी या कुटुंबीयांची भेट घेतली.सदरील तरुणांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधी मधून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे मागणी व चर्चा करून मदतीसाठी विनंती करणार आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर कार्याध्यक्ष माधव पावडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल पाटील इंगळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande