रत्नागिरी, 4 ऑक्टोबर, (हिं. स.) : महाराष्ट्रातील पहिल्या एचपीव्ही लसीकरणाचा आज रत्नागिरीत प्रारंभ झाला.जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या माध्यमातून जिल्हास्तरीय एचपीव्ही लस देण्याचा प्रारंभ येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात आज झाला. यावेळी पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, कॅन्सर झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा तो होऊच नये म्हणून जिल्ह्याच्या प्रशासनाने जबाबदारी स्वीकारली हे महत्त्वाचे आहे. माझ्या जिल्ह्यातील विद्यार्थिनींना, महिलांना कॅन्सरचा स्पर्श होऊ नये, भावी पिढीला कॅन्सर होणार नाही, त्यांचे आयुष्य सुखासमाधानाने निरोगी राहायला हवे, त्यासाठी जिल्ह्यातील ९ ते १४ वयोगटातील ५० हजार मुलींना एचपीव्ही ही लस देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून साडेचार कोटींचा निधी देण्यात आला आहे.
कॅन्सरच्या बाबतीत काळजी घेत असताना, आरोग्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचे राज्यात रत्नागिरी जिल्ह्यानेलसीकरणाचे पहिले पाऊल उचलले, रामबाण उपाय नंतर शोधण्यापेक्षा तो होऊच नये याची जबाबदारी प्रशासनाने स्वीकारली हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. आयुष्यामध्ये कॅन्सरसारखा आजार कधी होऊ नये, आयुष्य सुखासमाधानी राहावे यासाठी हे काम मी पुण्याचे मानतो. हा लसीकरणाचा कार्यक्रम फक्त जिल्ह्याला दिशा देणारा नाही, तर महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्राला दिशा देणारा आहे. माझ्या भावी पिढीला कॅन्सर होणार नाही, कॅन्सरसारख्या रोगापासून भावी पिढी वाचली पाहिजे. त्यासाठी अजून निधी लागला तर तो डीपीसीमधून, सीएसआरमधून दिला जाईल. आपल्या घरातल्या दिवसाला आर्थिक ताण पडू नये, म्हणून महिला स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात. त्यासाठी प्रत्येक गावामध्ये आरोग्य केंद्रामध्ये महिला, भगिनींची तपासणी झाली पाहिजे. महिला भगिनींनीही आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.
लसीकरणाच्या बाबतीत सोशल मीडियावर गैरसमज पसरणार नाही, याबाबत काळजी घ्या. त्यासाठी या लसीचे फायदे, त्याची माहिती याचा प्रसार पालकांमध्ये करावा. ज्येष्ठांना न्युमोनिया होऊ नये त्यासाठी ही लस बाजारात आली आहे. त्याबाबतची माहिती घ्यावी. ती लस ज्येष्ठांना देण्यासाठी आपण मागे राहणार नाही. शेवटी माणसाचे आयुष्य वाढविणे, माणसाला जगविणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. जिल्ह्यातील कुपोषित माता, कुपोषित बालके यांची संख्या शून्यावर व्हायला हवी. या लसीपासून कोणीही वंचित राहू नये, याची काळजी घ्या, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी आदी उपस्थित होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आठल्ये यांनी प्रास्ताविकात या लसीबाबत सविस्तर माहिती दिली.
कशी आहे लस?
ह्युमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजे एचपीव्ही. एचपीव्ही हा २०० हून अधिक विषाणूंचा समूह आहे. ज्यापैकी काही आरोग्य समस्या निर्माण करू शकतात. काही उच्च जोखीम असलेले एचपीव्ही प्रकार सर्व्हायकल कॅन्सर, रेक्टल कॅन्सर आणि थ्रोट कॅन्सरशी जोडलेले आहेत. एचपीव्हीशी संबंधित आजार टाळण्यासाठी किशोरवयीन मुलींकरिता याची शिफारस केली जाते. अनेक क्निनिकल चाचण्यांद्वारे ही लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. सर्व्हा/कल कॅन्सरचा नवीन संसर्ग रोखणे तसेच सर्व्हा/कल कॅन्सरमुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी करणे हे या लसीचे उद्दिष्ट आहे. या लसीचा सुरक्षिततेचा उत्कृष्ट रेकॉर्ड आहे. जगभरात लाखो डोस दिले जातात. ही लस संसर्गापtर्वी दिली गेली तर बचाव करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. या लसीकरणामुळे सर्व्हा/कल कॅन्सरचा धोका टळतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी