कोल्हापूर महापालिका प्रशासकांची कारवाई सुरु
प्रशासक के. मंजुलक्ष्मीची ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई कोल्हापूर, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। पालकमंत्री प्रकाश आबीटकर, आ. राजेश क्षीरसागर, आ. अमल महाडिक यांनी शुक्रवारी महानगरपालिकेत घेतलेल्या बैठकीमध्ये शहराच्या सर्वांगीन विकासासाठी रस्ते पाणीपुरवठा,
कोल्हापूर महानगरपालिका


प्रशासक के. मंजुलक्ष्मीची ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई

कोल्हापूर, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। पालकमंत्री प्रकाश आबीटकर, आ. राजेश क्षीरसागर, आ. अमल महाडिक यांनी शुक्रवारी महानगरपालिकेत घेतलेल्या बैठकीमध्ये शहराच्या सर्वांगीन विकासासाठी रस्ते पाणीपुरवठा, पार्किंग व इतर आवश्यक सोई सुविधा याबाबत बैठक घेऊन ठोस कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी आज काही महत्वाचे निर्णय घेऊन, काही ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई केली.

फुलेवाडी येथे अग्निशमन केंद्र विकास व कर्मचारी निवास्थान इमारतीच्या दुर्घटनाप्रकरणी कारवाई करीत फुलेवाडी फायर स्टेशन इमारत दुर्घटना प्रकरणी या एजन्सीमार्फत तांत्रिक लेखापरिक्षण करण्याच्या सूचना दिल्या. याप्रकरणी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले याला निलंबीत केले. तर शहर अभियंता रमेश मस्कर व उप-शहर अभियंता सुरेश पाटील यांची खातेनिहाय चौकशी का करु नये याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.

शहरासाठी व्हीजन डॉक्युमेंट तयार करण्याबाबत दिलेल्या सूचनेप्रमाणे महापानगरपालिकेने ब्लू लाईनमधील 100 फुटी रस्ता संपादन करणेकामी नगर विकास विभागास प्रस्ताव सादर करण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या खुल्या जागांना नांव लावणेची कार्यवाही करणे तसेच खुल्या जागेवरील अतिक्रमण निष्कासीत करणेची कारवाई करण्याचे नगरचना विभागास दिल्या आहेत.

शहरातील 100 कोटी निधीमधील व इतर रस्त्यांची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्वॉलीटी टेस्टींग एजन्सी मार्फत तपासणी करण्याचे आदेश प्रशासकांनी दिले आहेत. तसेच त्यानुसार संबधीत ठेकेदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच तसेच काळम्मावाडी येथील पंपींग मशनरी वावंवार बंद पडणे व गणेश उत्सवाच्या कालावधीत आठ दिवस बंद पडलेने याची सखोल चौकशी करण्यासाठी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाचे कार्यकारी अभियंत्यांमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत त्यांना दि.11 ऑक्टोंबर पर्यंत अहवाल सादर करण्याच्या सूचना कार्यकारी अभियंत्यांना दिल्या आहेत. तसेच शहरामध्ये गणेश उत्सवाच्या कालावधीत आठ दिवस पाणी पुरवठा खंडीत होऊन नागरीकांना नाहक त्रास झालेबद्दल जल अभियंता हर्षजीत घाटगे व सहा.अभियंता यांत्रिकी जयेश जाधव यांची खोत निहाय चौकशी का करण्यात येऊ नये म्हणून कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande