नगरपालिका, नगरपंचायती नगराध्यक्षपदाची सोमवारला आरक्षण सोडत
अमरावती, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। अमरावती जिल्ह्यात १० नगरपरिषद व ४ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सोमवारी, ६ ऑक्टोबर रोजी सोडत काढण्यात येणार आहे. ही सोडत मंत्रालय, मुंबई येथील परिषद सभागृह, सहावा मजला येथे पार पडणार आहे. जि
नगरपालिका, नगरपंचायती नगराध्यक्षपदाची सोमवारला आरक्षण सोडत


अमरावती, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। अमरावती जिल्ह्यात १० नगरपरिषद व ४ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सोमवारी, ६ ऑक्टोबर रोजी सोडत काढण्यात येणार आहे. ही सोडत मंत्रालय, मुंबई येथील परिषद सभागृह, सहावा मजला येथे पार पडणार आहे.

जिल्ह्यात १० नगरपालिका व दोन नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. हा कार्यक्रम ८ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून २८ ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. अशातच आता नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडतीचा कार्यक्रम देखील आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. सद्या जिल्ह्यात तिवसा आणि भातकुली या दोन नगरपंचायती वगळता १० नगरपालिका आणि दोन नगरचायतींवर प्रशासक आहे. त्यामुळे येथे आता प्रशासनस्तरावर निवडणुकीचीलगीनघाई सुरू आहे. डिसेंबरमध्ये जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतीमध्ये निवडणुकांची शक्यता आहे.आरक्षण या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच नगराध्यक्षपदांकरिता कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्यातील अचलपूर, अंजनगाव सुर्जी, चांदूरबाजार, चांदूर रेल्वे, चिखलदरा, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, मोर्शी, शेंदूरजनाघाट, वरूड या नगरपरिषदा तर धारणी, नांदगाव खंडेश्वर, तिवसा आणि भातकुली या नगरपंचायतीच्यानगराध्यक्षपदाकरिता आरक्षण सोडत मुंबई येथे काढली जाणार आहे.सुरक्षिततेच्या कारणास्तव मंत्रालयीन प्रवेशाची परिस्थिती लक्षात घेऊन प्रत्येक पक्षाच्या वतीने फक्त दोन प्रतिनिधींनाच सोडतीसाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांच्या अध्यक्ष, सचिवयांनी दोन प्रतिनिधींची नावे शिफारस करून शासनाकडे पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande