नांदेड - माता साहेबदेवजी यांच्या 344 व्या जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ!
नांदेड, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। नांदेड गुरुद्वारा माता साहेब, मुगट परिसर येथे शनिवारी सकाळी माता साहेब देवाजी यांच्या 344 व्या जन्मोत्सव कार्यक्रमास सुरुवात झाली. तसेच दिवान व कीर्तन दरबार कार्यक्रमास सकाळ पासून प्रारम्भ झाले. हा जन्मोत्सव सोहळा तीन
अ


नांदेड, 4 ऑक्टोबर (हिं.स.)।

नांदेड गुरुद्वारा माता साहेब, मुगट परिसर येथे शनिवारी सकाळी माता साहेब देवाजी यांच्या 344 व्या जन्मोत्सव कार्यक्रमास सुरुवात झाली. तसेच दिवान व कीर्तन दरबार कार्यक्रमास सकाळ पासून प्रारम्भ झाले. हा जन्मोत्सव सोहळा तीन दिवस चालणार आहे.

शनिवारी सकाळी गुरुद्वारा माता साहेब येथे श्री गुरु ग्रंथसाहेबांचे पाठ सुरु करण्यात आले. नंतर श्री गुरु ग्रन्थ साहेब यांची विधिवत यात्रा काढून मुख्य दिवान हाल मध्ये श्री गुरु ग्रन्थ साहेब यांना प्रकाशमान करण्यात आले. जन्मोत्सव सोहळ्याचे रीतसर उदघाटन तखत सचखंड श्री हजुरसाहिब येथील मीत ग्रंथी भाई गुरमीत सिंघजी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. तर यावेळी संतबाबा नरिंदर सिंघजी करसेवा वाले, संतबाबा बलविंदरसिंघजी करसेवा वाले, गुरुद्वारा माता साहेबचे मुख्य जत्थेदार संत बाबा तेजासिंघजी यांची मुख्य उपस्थिती होती. तसेच पंजाबहुन आलेल्या निहंग सिंघांचे दल प्रमुख आणी संत मंडळीची उपस्थिती लाभली.

माता साहेब देवाजी यांच्या जन्मोत्सवानिमित्त जिल्हा परिषद व पशुसंवर्धन विभागातर्फे मार्गदर्शन मंच स्थापित करण्यात आले. यावेळी अश्व उपचाराची ही सोय करण्यात आली. उद्या रविवारी दुपारी 3.30 वाजता नेजाबाजी घोड दौड कार्यक्रम ठेवण्यात आले आहे. वरील कार्यक्रम स्थळी सर्वधार्मियांसाठी लंगर प्रसादाची सोय करण्यात आली आहे. कार्यक्रम ठिकाणी पोलिस विभागाने मोठे बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे. सोमवार रोजी दुपारी जन्मोत्सव कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande