आयटीआय परिक्षेत देशात दुसरी, लातूरच्या मदिरा सय्यदचा पंतप्रधानांकडून सत्कार
नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर (हिं.स.) - जुलै २०२५ मध्ये झालेल्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेत (आयटीआय) भारतात द्वितीय स्थान पटकावणाऱ्या लातूरमधील मदिया खदीर सय्यद हिचा दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार झाला. ​गरिबीवर जिद्दीने मात करत, त
पंतप्रधान नरेंद्र मोदी


नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर (हिं.स.) - जुलै २०२५ मध्ये झालेल्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेत (आयटीआय) भारतात द्वितीय स्थान पटकावणाऱ्या लातूरमधील मदिया खदीर सय्यद हिचा दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार झाला.

​गरिबीवर जिद्दीने मात करत, तिचे वडील बांधकाम मजूर असूनही त्यांनी शिक्षणासाठी कोणतीही कमतरता ठेवली नाही. मदियाने मिळवलेलं हे यश केवळ तिचं एकटीचं नाही, तर तिच्या आई-वडिलांच्या कष्टाचं, तिच्या गुरुजनांच्या मार्गदर्शनाचं आणि सर्वसामान्य परिस्थितीतून मोठी स्वप्नं पाहणाऱ्या प्रत्येक मुलीचं प्रतीक आहे.

​९९.६६% गुणांसह तिने मिळवलेलं हे यश खरंच खूप प्रेरणादायक आहे. महाराष्ट्राचं आणि रेणापूरचं नाव राष्ट्रीय स्तरावर नेणाऱ्या या कर्तृत्ववान कन्येचे सर्वत्र कौतुक होत आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande