गाझामध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या निर्णयाचे पंतप्रधान मोदींकडून स्वागत
नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर (हिं.स.) - गाझामध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांमध्ये निर्णायक प्रगती होत आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ओलिसांच्या सुटकेचे संकेत हे स
पंतप्रधान मोदी


नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर (हिं.स.) - गाझामध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांमध्ये निर्णायक प्रगती होत आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ओलिसांच्या सुटकेचे संकेत हे सध्या सुरू असलेल्या मानवतावादी आणि राजनैतिक प्रयत्नांतील एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे मोदी म्हणाले.

“या प्रदेशात शाश्वत आणि न्याय्य शांततेसाठी योगदान देणाऱ्या सर्व उपक्रमांना पाठिंबा देण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर भारत दृढ आहे,” याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.

आपल्या एक्स पोस्टमध्ये, पंतप्रधानांनी लिहिले आहे, “गाझामधे शांतता प्रस्थापित करण्यासाठी होणाऱ्या प्रयत्नांमध्ये निर्णायक प्रगती होत असताना आम्ही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहोत. ओलिसांच्या सुटकेचे त्यांनी दिलेले संकेत हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.”

“भारत कायमस्वरूपाच्या आणि न्याय्य शांततेच्या दिशेने सर्व प्रयत्नांना जोरदार पाठिंबा देत राहील.”

“गाझामधे शांतता प्रस्थापित करण्यासाठी होणाऱ्या प्रयत्नांमध्ये निर्णायक प्रगती होत असताना आम्ही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी घेतलेल्या नेतृत्वाचे आम्ही स्वागत करत आहोत. ओलिसांच्या सुटकेचे संकेत हे त्यातील एक महत्त्वाचे पाऊल आहे.”

“भारत आपल्या कायमस्वरूपाच्या आणि न्याय्य शांततेच्या दिशेने सर्व प्रयत्नांना जोरदार पाठिंबा देत राहील.”

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande