पुणे : पाच ‘एसटीपी’ केंद्रांची कामे अद्याप अपूर्णच
पुणे, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। शहरातील मुळा-मुठा नदी शुद्धीकरण प्रकल्पातील (जायका) पाच केंद्रांची कामे पूर्ण होण्याची अद्याप चिन्हे नाहीत. जून-जुलैतच पाचही केंद्रे सुरू होणार असल्याचा दावा महापालिकेने केला होता.मात्र, प्रारंभीच ठेकेदाराच्या संथगती कारभारा
पुणे : पाच ‘एसटीपी’ केंद्रांची कामे अद्याप अपूर्णच


पुणे, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। शहरातील मुळा-मुठा नदी शुद्धीकरण प्रकल्पातील (जायका) पाच केंद्रांची कामे पूर्ण होण्याची अद्याप चिन्हे नाहीत. जून-जुलैतच पाचही केंद्रे सुरू होणार असल्याचा दावा महापालिकेने केला होता.मात्र, प्रारंभीच ठेकेदाराच्या संथगती कारभाराचा केंद्रांच्या कामास फटका बसला. त्यानंतर आता जोरदार पावसासह विविध तांत्रिक कारणांमुळे पाचही केंद्रांची कामे पूर्ण होण्यास आणखी तीन महिने वाट पाहावी लागणार आहे. केंद्र सरकारमार्फत जपान इंटरनॅशनल को - ऑपरेशन एजन्सीच्या (जायका) आर्थिक सहकार्यातून आणि राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पांतर्गत नद्यांमध्ये सोडल्या जाणाऱ्या मैलापाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी शहरात ११ ठिकाणी मैलापाणी शुद्धीकरण केंद्र (एसटीपी) उभारण्यात येणार आहेत.या प्रकल्पामुळे नदीमध्ये प्रक्रिया केलेले पाणी जाण्यास मदत होऊन नदी प्रदूषणास आळा बसणार आहे. दरम्यान, ११ एसटीपी केंद्रांपैकी ५ केंद्रांची कामे प्रगतिपथावर होती, तर जागेच्या प्रश्‍नासह वेगवेगळ्या कारणांमुळे उर्वरित केंद्राची कामे संथगतीने सुरू आहेत. महापालिकेने हाती घेतलेल्या ‘एसटीपी’च्या कामास अगोदर लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा फटका बसला होता. त्यानंतर ठेकेदाराच्या संथगती कारभाराचा फटका महापालिकेस बसल्याने विलंबामध्ये आणखी भर पडली. दरम्यान, ५ केंद्रांची कामे जलदगतीने करून, जुलैत संबंधित केंद्र कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे महापालिकेने सांगितले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande