नाशिक, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। व्यवसाय वृद्धी साठी व्यवसायिकाची तसेच ब्रँड ची सकारात्मक प्रतिमा महत्त्वाची असून ही प्रतिमा सादर करण्यामध्ये माध्यमांची मोलाची भूमिका असल्याचे प्रतिपादन माध्यम आणि जनसंपर्क तज्ञ डॉ .अभिजीत चांदे यांनी केले. ते ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल ( बी बी एन जी) च्या एका कार्यक्रमात व्यवसायिकांना मार्गदर्शन करत होते .
ते म्हणले की सकारात्मक प्रतिमेचा उपयोग हा सर्वांगांनी होत असून सकारात्मक प्रतिमा असल्यास ग्राहकांसोबतच ,गुंतवणूकदार ,भागधारक, सप्लायर ,बँकर आणि मनुष्यबळ देखील सकारात्मक प्रतिमेच्या व्यवसायिकांना अधिक प्रभावीपणे सेवा देतात. ही प्रतिमा प्रभावीपणे सादर करण्यासाठी माध्यमांमध्ये जाहिरात ,ॲडव्टोरियल ,विविध प्रासंगिक उपक्रम असे विविध पर्याय उपलब्ध आहेत . आज जरी अनेक माध्यमांचा पर्याय उपलब्ध असला तरी आजही प्रिंट मीडिया सर्वाधिक विश्वासार्ह असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.
व्यवसायिक हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असून रोजगार निर्मितीमध्ये देखील त्याची महत्त्वाची भूमिका आहे. उत्तम प्रतिमे सोबतच नेटवर्किंग हे देखील व्यवसाय वाढण्यासाठीचे महत्त्वाचे टूल असून नेटवर्किंग आणि प्रतिमा हे एकमेकास पूरक असल्याचे देखील ते म्हणाले
यावेळी मंचावर बी बी एन जी चे संस्थापक अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी , रसिका कुलकर्णी अमोल कुलकर्णी संदीप कुलकर्णी तसेच व्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV