अभिनेत्री संध्या शांताराम यांना नांदेडमधूनही श्रद्धांजली
नांदेड, 4 ऑक्टोबर (हिं.स.) - ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी आहे. अशा शब्दात नांदेड जिल्ह्यातील नागरिकांसह स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. नवरंगमधील “अरे जा रे नटखट” म
अ


नांदेड, 4 ऑक्टोबर (हिं.स.) - ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी आहे. अशा शब्दात नांदेड जिल्ह्यातील नागरिकांसह स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. नवरंगमधील “अरे जा रे नटखट” मधील दुहेरी भूमिका, पिंजरा सारखा यशस्वी चित्रपट आणि हिंदी-मराठी सिनेमात त्यांनी उमटवलेला ठसा आजही प्रेक्षक विसरू शकलेले नाहीत. व्ही. शांताराम यांच्यासोबतच्या नात्यात त्यांनी ज्या समंजसपणे कुटुंब स्वीकारलं, त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची महानता दिसते. गेल्या अनेक वर्षांपासून त्या मीडियापासून दूर असल्या तरी त्यांचं निस्सीम सौंदर्य, सोज्वळता आणि अप्रतिम नृत्यकला हे भारतीय चित्रपटसृष्टीचं अमूल्य वैभव आहे. संध्या शांताराम यांना भावपूर्ण श्रद्धांजली! ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, हीच प्रार्थना! त्यांचं कार्य आणि संस्कार भावी पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी ठरत राहतील!

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande