सोलापूर, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। शेतकऱ्यांच्या उसातून १५ रुपये शासन घेणार असून हा प्रकार म्हणजे मड्याच्या टाळूवरचे लोणी घेण्यासारखा असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी माढा तालुक्यातील सीना नदीला आलेल्या महापुराच्या नुकसानीची पहाणी करताना रिधोरे येथे बोलताना सांगितले.
यावेळी राजू शेट्टी यांनी माढा तालुक्यातील तांदूळवाडी, रिधोरे, निमगाव, दारफळ या चार पूरग्रस्त गावांमध्ये पहाणी दौरा केला. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना श्नी. शेट्टी म्हणाले की अतिवृष्टीमुळे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास ज्या पिकाचे नुकसान झाले आहे. त्या पिकासाठी घेतलेले कर्ज पूर्ण माफ केले पाहिजे.ज्यांचे कर्ज नाही त्यांना एनडीआरएफ च्या ८५०० रुपयांच्या निकषाच्या तिप्पट मदत दिली पाहिजे. गावात पाणी शिरले असल्यास दुकान, घरा़चेही नुकसान दिले पाहिजे. यापूर्वी असे निर्णय घेतले आहेत. अशा पध्दतीने नुकसान भरपाई देण्यासाठी शासननिर्णय लागू करावा. परंतु त्या शासन निर्णयात बदल जास्त मदत करण्यापेक्षा शासन उलट पूर्वीच्या निकषापेक्षा कमी मदत करण्याची भूमिका घेत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड