सोलापूर, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। अतिवृष्टी आणि महापुराचे पाणी घरात शिरल्याने नुकसान झालेल्यांना शासनाच्या वतीने प्रतिकुटुंब १० हजार रुपये दिले असून, आजपर्यंत जिल्ह्यातील १३ हजार १९४ जणांच्या खात्यावर १३ कोटी १९ लाख ४० हजार रुपये जमा झाले आहेत. मदत वाटपाचे १ कोटी ५० लाख ९० हजार रुपये शिल्लक असून ही मदत १ हजार ५०९ जणांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे. प्रतिकुटुंब दहा हजारांप्रमाणे १४ हजार ७०३ जणांसाठी १४ कोटी ७० लाख ३० हजार रुपयांची मदत जिल्हा प्रशासनाने बँकेत जमा केली आहे.
माढा तालुक्यातील ४७९४, उत्तर सोलापूर २३९१, बार्शी ३२४, दक्षिण सोलापूर ३५१, अक्कलकोट ९३७, पंढरपूर १११, मोहोळ २५५७, करमाळा ५६५, सांगोला ६६ आणि मंद्रूप अपर तहसीलमधील २६०७ जणांना ही मदत मिळणार आहे. यातील शिल्लक राहिलेल्या १५०९ जणांमध्ये माढ्यातील १०५०, उत्तर सोलापुरातील ७०, दक्षिण सोलापूर ४३, पंढरपुरातील ३६, मोहोळ ३१० जणांचा समावेश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड