सोलापुरातील १०० धार्मिक स्थळांनी स्वत:हून काढले भोंगे
सोलापूर, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। सोलापूर शहरात मंदिरे, मशिदी, मदरसा, चर्च, बुद्धविहार अशी ८९३ धार्मिक स्थळे पोलिसांच्या रेकॉर्डला आहेत. त्यातील २५० धार्मिक स्थळांवर परवाना घेऊन भोंगे, स्पीकर लावलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहर पोलिसां
सोलापुरातील १०० धार्मिक स्थळांनी स्वत:हून काढले भोंगे


सोलापूर, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। सोलापूर शहरात मंदिरे, मशिदी, मदरसा, चर्च, बुद्धविहार अशी ८९३ धार्मिक स्थळे पोलिसांच्या रेकॉर्डला आहेत. त्यातील २५० धार्मिक स्थळांवर परवाना घेऊन भोंगे, स्पीकर लावलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहर पोलिसांनी केलेल्या आवाहनानंतर त्यापैकी १०० धार्मिक स्थळांच्या ट्रस्टींनी स्वत:हून भोंगे-स्पीकर काढून घेत, आतील बाजूला लावले आहेत.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही धार्मिक स्थळांच्या बाहेरील तथा वरच्या बाजूला भोंगे लावता येणार नाहीत. भोंगे लावण्यासाठी यापुढे परवाना दिला जाणार नाही. धार्मिक स्थळांवरील भोंग्यांऐवजी आता आवाजाची मर्यादा पाळून स्पीकर लावावा लागणार असून, तोही आतील बाजूलाच असणार आहे. तत्पूर्वी, शहरातील सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या हद्दीतील धार्मिक स्थळांचे ट्रस्टी, मौलवी, पुजाऱ्यांसमवेत बैठका घेतल्या.त्या बैठकीत पोलिसांनी केलेल्या आवाहनानंतर अनेकांनी धार्मिक स्थळांवरील भोंगे स्वत:हून काढण्यासाठी सकारात्मकता दर्शवत ते काढूनही घेतले आहेत. विनापरवाना भोंगे किंवा स्पीकर लावून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई देखील केली जाणार आहे. यापूर्वी अशा कारवाया करण्यात आल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande