सोलापूर, 4 ऑक्टोबर (हिं.स.)।सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत न केल्यास माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्यासह आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरणार आहोत. सगळ्या गोष्टींचे पंचनामे करून घ्यावे. पंचनामे नसल्यास मदत मिळण्यात अडचणी येतील असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.यावेळी आमदार पवार म्हणाले की राज्यामधे मागील तीन - साडेतीन महिन्यांमधे साठे लाख हेक्टर साडेचार लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. मागील महिन्याभरात ३० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.सोलापूर जिल्ह्यातील साडेचार लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून माढा तालुक्यातील ९० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत दिली पाहिजे. हेक्टरी दीड लाख रूपये मदत जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना द्यावी.या महापुरात वाहून गेलेली जमीन, पिके, ठिबक सिंचन, पाईपलाईन, सोलार, विद्युतपंप अशा सगळ्याच गोष्टीचे पंचनामे करणे गरजेचे आहे. सध्या शासन जी मदत देईल ते देईल, पण नंतर या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही विधिमंडळात आवाज उठवू पंचनामे झाल्यास याबाबत शासनाकडून मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करू. शासनाने कर्जमाफी करावी.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड