परभणी, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। मुख्यमंत्री यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रम अंतर्गत परभणी शहर महानगरपालिकेत अनुकंपा नियुक्तीस पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. नितीन नार्वेकर यांच्या हस्ते या उमेदवारांना अनुकंपा तत्वावर नियुक्तीचे आदेश देण्यात आले. या वेळी एकूण तीन वारसांना नियमित नियुक्ती प्रदान करण्यात आली.
नियुक्ती मिळालेल्या उमेदवारांची नावे : सुमित भागवत सावंत — लिपिक (गट-क), मयूर ज्ञानेश्वर जाधव — लिपिक (गट-क), अरुण बापूराव काळे — शिपाई (गट-ड)
या कार्यक्रमास महानगरपालिका उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे, कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के. के. आंधळे, आस्थापना विभाग प्रमुख शिवाजी सरनाईक, तसेच मुजमुले, मंगल धस, मंगल वाघमारे आदी कर्मचारी उपस्थित होते.
या प्रसंगी आयुक्त नार्वेकर यांनी बोलताना सांगितले की, “महानगरपालिकेतील दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना न्याय देणे ही आपली जबाबदारी आहे. अनुकंपा नियुक्तीमुळे त्यांच्या कुटुंबांना आर्थिक व मानसिक दिलासा मिळेल,” असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आस्थापना विभागाने केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis