अमरावतीत रविवारी हाफ मॅरेथॉन, राज्यभरातील स्पर्धक होणार सहभागी
अमरावती, 4 ऑक्टोबर (हिं.स.)।अमरावती मॅरॉथॉन असोशिएशन व्दारे रविवारी (ता. पाच) आयोजित आठव्या अमरावती मॅरॉथन स्पर्धेमध्ये अमरावतीसह, राज्यातील व राज्याबाहेरील तीन हजाराहून अधिक धावकांनी सहभाग नोंदविला आहे. ही मॅरॉथॉन २१ किलोमीटर, १० किलोमीटर व पाच किलो
रविवारी धावणार तीन हजार धावक आठवी अमरावती हाफ मॅरेथॉन राज्यभरातील स्पर्धक होणार सहभागी


अमरावती, 4 ऑक्टोबर (हिं.स.)।अमरावती मॅरॉथॉन असोशिएशन व्दारे रविवारी (ता. पाच) आयोजित आठव्या अमरावती मॅरॉथन स्पर्धेमध्ये अमरावतीसह, राज्यातील व राज्याबाहेरील तीन हजाराहून अधिक धावकांनी सहभाग नोंदविला आहे. ही मॅरॉथॉन २१ किलोमीटर, १० किलोमीटर व पाच किलोमीटर फिटनेस रन सर्वाकरिता तसेच पाच किलोमीटर मुलांकरीता या प्रकारात होणार आहे. २१ किलोमीटरची स्पर्धा रविवारी सकाळी ६ वाजता सुरु होणार आहे. तर दहा किलोमीटर पॉवर रन सकाळी ६.१५ वाजता, पाच किलोमीटर मुलांचा रन पहाटे ६.३० वाजता आणि पाच किलोमीटर फिटनेस रन सकाळी ६.४० प्रारंभ होणार आहेत.२१ किलोमीटर मैराथॉन शिवाजी शारिरीक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणातून सुरू होईल. नंतर पंचवटी मार्गे वेलकम पॉईन्ट, बियाणी चौक, गर्ल्स हायस्कूल चौक, गाडगेबाबा मंदिराकडे फ्लायओव्हरवरून गाडगेनगर, कठोरा नाका ते पोटे इंजिनिअरिंग कॉलेज व तेथून युटर्न घेऊन परत याच मागनि मॅरेथॉन सुरू झालेल्या ठिकाणीच संपणार आहे.

१० किलोमीटरच्या मॅरेथॉनचा मार्ग शिवाजी शारिरीक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणातून सुरू होईल नंतर पंचवटी मार्गे वेलकम पॉईन्ट, बियाणी चौक, गर्ल्स हायस्कूल चौक, गाडगेबाबा मंदिरा कडे फ्लायओव्हर पुलावरून गाडगेनगर वतेथून युटर्न घेऊन परत याच मार्गाने मॅरेथॉन सुरू झालेल्या ठिकाणीच मॅरेथॉन संपणार आहे. ५ किलोमीटरची स्पर्धा शिवाजी शारिरीक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणातून सुरू होईल. नंतर पंचवटीमार्गे वेलकम पॉईन्ट ते विभागीय आयुक्त कार्यालय व तेथून युटर्न घेऊन परत याच मागनि मॅरेथॉन संपणार आहे. धावमार्गात शारिरीक वेदनाशामक स्प्रे सुध्दा ठेवण्यात येणार आहेत. मॅरॉथॉन सुरळीत पार पडण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयाकडून वाहतूक पोलिसाची मदत घेतली जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या सुविधा पुरविल्या जाणार

मॅरॉथॉनचे मार्गात धावकांचा उत्साह कायम राहण्यासाठी मॅरॉथॉनच्या मार्गात दोन ठिकाणी धावकांचे तुतारीने स्वागत केले जाणार आहे. मॅरॉथॉन सुरु होण्यापुर्वी वार्मअप व्हावा, यासाठी मॅरॉथॉनच्या स्टार्ट पॉईन्टला झुम्बाचे आयोजन केले आहे. मॅरॉथॉनच्या मार्गात ७ ते ८ ठिकाणी वॉटर स्टेशन राहणार आहेत. याठिकाणी, एनरझल, पाणी, खजूर, केळी, चॉकलेट, सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande