तुळजापूर : मंदिरात 2 दिवस व्हिआयपी दर्शन बंद
छत्रपती संभाजीनगर, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नवरात्रीच्या शेवटच्या टप्प्यात येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेला होणारी प्रचंड
अ


छत्रपती संभाजीनगर, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नवरात्रीच्या शेवटच्या टप्प्यात येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेला होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, गैरसोय टाळण्यासाठी दोन दिवसांकरिता व्हीआयपी आणि देणगी दर्शन बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

मंदिर संस्थानच्या प्रशासक तथा तहसीलदार माया माने यांच्या स्वाक्षरीने जारी केलेल्या पत्रकानुसार, यावर्षी शारदीय नवरात्र महोत्सव दिनांक २२ सप्टेंबर २०२५ ते ७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत संपन्न होत आहे. या काळात महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांसह देशभरातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी तुळजापुरात दाखल होतात.विशेषतः महोत्सवाच्या अखेरीस, सोमवार, दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ आणि मंगळवार, दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ रोजी कोजागिरी पौर्णिमा आहे. या दिवशी देवीच्या दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणेच भाविकांची प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. ही गर्दी आणि त्यामुळे भाविकांची होणारी गैरसोय टाळण्याच्या उद्देशाने मंदिर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार, दिनांक ६ आणि ७ ऑक्टोबर २०२५ या दोन दिवशी ५०० रुपयांचे व्ही.आय.पी. संदर्भ दर्शन आणि १००० रुपयांचे सशुल्क देणगी दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेमंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, जरी दोन विशेष दर्शन प्रकार बंद असले तरी, सर्वसामान्य भाविकांसाठी नियमित धर्मदर्शन (विनाशुल्क), मुखदर्शन आणि ३०० रुपयांचे सशुल्क देणगी दर्शन पास पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील. तसेच, घाटशीळ पार्किंग मार्गावरील वाहतूकही नियमितपणे सुरू राहील.सर्व भाविकांनी या बदलाची नोंद घेऊन मंदिर प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दर्शनाचे नियोजन सुरळीत पार पडावे आणि भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande