पुणे, 4 ऑक्टोबर (हिं.स.)।पुण्यात झालेल्या वार्तालप कार्यक्रमातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यवरून भाजपवर थेट हल्ला केला आहे. हिंदुत्वाची व्याख्या आणि राजकीय मैत्री यावरून त्यांनी भाजपला कोंडीत पकडले आहे. भाजपने एनडीएच्या घटक पक्षांशी केलेल्या युतीवर बोट ठेवत, जेव्हा आम्ही भाजपसोबत होतो, त्यावेळी कडवट हिंदुत्ववादी होतो. भाजपला सोडले म्हणजे हिंदुत्व सोडले का? असा आक्रमक सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
यावेळी ठाकरे म्हणाले की, आम्ही काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडले म्हणता. मग नितीश कुमार हिंदुत्ववादी आहेत का? चंद्राबाबू हिंदुत्ववादी आहेत का? भाजपचे मुस्लिम सौगात ए मोदी वाटत आहेत, ३२ लाख लोकांना सौगात ए मोदी वाटतात. तरीही ते हिंदुत्ववादी. म्हणजे याचा अर्थ असा की भाजप जे करेल ते अमर प्रेम आणि इतरांनी केले तर लव्ह जिहाद, असे कसं होऊ शकते? अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. पुण्यातील वार्तालप कार्यक्रमातून बोलताना त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. आम्ही काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडले म्हणता. मग नितीश कुमार हिंदुत्ववादी आहेत का? चंद्राबाबू हिंदुत्ववादी आहेत का? भाजपचे मुस्लिम सौगात ए मोदी वाटत आहेत, ३२ लाख लोकांना सौगात ए मोदी वाटतात. तरीही ते हिंदुत्ववादी. म्हणजे याचा अर्थ असा की भाजप जे करेल ते अमर प्रेम आणि इतरांनी केले तर लव्ह जिहाद, असे कसं होऊ शकते? अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु