* उपक्रमात सहभागी होण्यासाठी 4 ते 24 ऑक्टोबर दरम्यान अर्ज दाखल करता येणार
पणजी, 4 ऑक्टोबर (हिं.स.) - राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या (एनएफडीसी) वेव्हज फिल्म बाजार 2025 ने प्रोड्यूसरलँड सोबत स्टोरीकल्चरच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रमुख उपक्रमासाठी धोरणात्मक सहकार्याची घोषणा केली आहे. 20–24 नोव्हेंबर या कालावधीत गोव्यातील पणजी येथे होणाऱ्या वेव्हज फिल्म बाजारच्या 19 व्या कार्यक्रमात उच्च-प्रभावी निर्मिती कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे.
2025 निर्मिती कार्यशाळेमध्ये दक्षिण आशियाई चित्रपट निर्मात्यांना दोन वेगवेगळ्या मार्गांसाठी मार्गदर्शन केले जाईल:सक्रिय प्रकल्प नसलेल्या निर्मात्यांसाठी व्यावसायिक विकास आणि मार्गदर्शनावर लक्ष केंद्रित करत करिअरचा विकास आणि प्रकल्प सहाय्य -सक्रियपणे प्रकल्प विकसित करणाऱ्या निर्मात्यांसाठी मार्गदर्शन, अभिप्राय आणि संधी प्रदान करणे.
या कार्यशाळेसाठी अर्ज करण्याचा कालावधी दिनांक 4 ऑक्टोबर 2025 ते 24 ऑक्टोबर 2025 हा आहे. चार दिवसांत (21–24 नोव्हेंबर 2025), सहभागींना मास्टरक्लास, परिपूर्ण मार्गदर्शन, प्रकल्प-केंद्रित गट आणि संध्याकाळच्या नेटवर्किंग सत्रांमध्ये सहभागी होता येईल. या कार्यक्रमात अनुभवावर आधारित शिक्षण, जागतिक बाजारपेठेविषयी दृष्टीकोन, वित्तपुरवठा धोरणे आणि सह-उत्पादन संधी एकत्रितपणे सहकार्य पूर्ण वातावरणात सादर केल्या जातील.
2025 कार्यशाळेसाठी सहभागी झालेल्या निवडक प्रशिक्षणार्थींना प्रोड्यूसरलँडच्या वर्षभर चालणाऱ्या उत्साहपूर्ण समुदायात प्रवेश मिळेल, ज्यामुळे त्यांना सतत मार्गदर्शन मिळेल आणि समवयस्कांशी आदानप्रदान करता येईल. तसेच बाजारपेठेबाहेरही सहयोगी संधी उपलब्ध होतील.
वेव्हज फिल्म बाजारचा हा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम दक्षिण आशियाई चित्रपट निर्मात्यांना सक्षम बनविण्यासाठी आणि या क्षेत्रातील जागतिक सहकार्याला चालना देण्यासाठी समर्पित आहे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपले चित्रपट प्रदर्शित करणाऱ्या उत्पादकांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, नेटवर्किंग तसेच सह-निर्मितीच्या संधी निर्माण करण्याच्या दोन्ही संस्थांच्या सामायिक दृष्टिकोनाला हा उपक्रम बळकटी देतो.
वेव्हज फिल्म बाजारच्या दक्षिण आशियाई निर्मात्यांसाठी केंद्रित केलेल्या, बंद-दाराआड घेण्यात येणाऱ्या प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्याच्या या उपक्रमाला एक महत्वपूर्ण इतिहास आहे, ज्यामध्ये अकादमी पुरस्कार विजेत्या निर्मात्या गुनीत मोंगा आणि एमी पुरस्कार विजेत्या चित्रपट निर्मात्या रिची मेहता यांसारख्या या उद्योगातील पुरस्कार विजेत्या धुरिणांचा समावेश आहे. या निमित्ताने, प्रोड्यूसरलँड उच्च-प्रभावशाली गटांचा सिद्धीचा मार्ग दर्शवितो. ज्यातून सखोल मार्गदर्शन, समवयस्कांशी आदानप्रदान आणि धोरणात्मक मार्गदर्शनाचा विकास होतो. 2021 पासून आठ गटांमध्ये 80 हून अधिक उत्पादक या उपक्रमाद्वारे जोडले गेले आहेत.
2007 मध्ये एनएफडीसीने सुरू केलेला, वेव्हज फिल्म बाजार ही दक्षिण आशियातील सर्वात मोठी चित्रपटांची बाजारपेठ बनली आहे आणि दक्षिण आशियाई प्रदेशातील प्रतिभावंत कलाकार आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट क्षेत्रातील सहकार्यासाठी हे एक अग्रगण्य व्यासपीठ मानले जाते.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी