पुणे, 4 ऑक्टोबर (हिं.स.)औद्योगिक विकास प्रक्रियेत मनुष्यबळ व्यवस्थापकांची भूमिकामहत्वाची असून बदल आणि धोरणात्मक प्रक्रियेतील त्याचा सहभाग मोलाचा असतो असे मत मॉरिशस येथील ला सेंटिनेल ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मॉरिशसच्या मनुष्यबळ व्यवस्थापक संघटनेचे अध्यक्ष आरिफ सलारू यांनीव्यक्त केले.
यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या चिंचवड येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) येथील एमबीए विद्या शाखेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी संघटनात्मक यशासाठी मनुष्यबळ व्यवस्थापकाचे नेतृत्व परिणामकारक ठरते असे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी आवर्जून प्राध्यापक डेव्ह उलरिच यांचे एचआर प्रारूप अभ्यासावे असे सांगितले.यावेळी प्रश्नोत्तरांच्या सत्रात विद्यार्थ्यांनी उत्साही सहभाग घेतला.
तसेच याप्रसंगी आयआयएमएस व मॉरिशसची मनुष्यबळ व्यवस्थापक संघटनायांच्यात सामंजस्यकरारकरण्यातआला. या करारावर एमएएचआरपीचे अध्यक्ष आरिफ सलारू आणियशस्वी संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी स्वाक्षरीकेली. विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील उद्योजकीय घडामोडी,अर्थकारणावर होणारा परिणाम आदी बाबी थेट समजून घेता याव्यात यासाठी या संवाद सत्राचे आयोजन करण्यात आल्याचे आयआयएमएसचे संचालक डॉ.शिवाजी मुंढेयांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सांगितले.तसेच या सामंजस्य करारामुळे विद्यार्थ्यांना जागतिक अनुभव,धोरणात्मक अंतर्दृष्टी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी भविष्यातील संधी याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन उपलब्ध होईल,असेही डॉ.मुंढेम्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु