पुणे, 4 ऑक्टोबर (हिं.स.) महाराष्ट्रात कमी वेळातच चर्चेत आलेली नृत्यांगना गौतमी पाटील आता चांगल्या अडचणीत आली आहे. गौतमीच्या मालकीच्या कारने 30 सप्टेंबरच्या पहाटे नवले पुलावर एका रिक्षाला धडक दिली होती. रिक्षा चालक सामाजी विठ्ठल मरगळे गंभीर जखमी झाले. त्यांच्या रिक्षेला कारने तीन पलटी मारल्या, मात्र कोणालाही त्यांना मदत केली नाही.रिक्षा चालकाच्या कुटुंबाने सिंहगड रोड पोलिस स्टेशनसमोर आंदोलन करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.
चंद्रकांत पाटील यांनीही पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे गौतमी पाटीलच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वाहन अपघाताचा तपास वर्ग करण्यात आला आहे. तपास सुरू असताना पाहिले जात आहे की, गौतमी पाटीलच्या ड्रायव्हरने अमली पदार्थ किंवा मद्य सेवन केले होते का ?त्यावेळी वाहन चालवणाऱ्याचे रक्ताचे नमुने फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आले आहेत. गौतमी पाटीलला जबाब देण्यासाठी हजर राहण्याची नोटीस पुणे पोलिसांनी दिली आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी मिळवले असून त्याचा तपास सुरु आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु