सोलापूर, 4 ऑक्टोबर (हिं.स.)।
सोलापूर जिल्ह्यातचे शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्यावर प्राणघातक हल्ला झालाय. महेश चिवटे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ओएसडी मंगेश चिवटेंचे ज्येष्ठ बंधू आहेत. महेश चिवटे यांच्यावर प्राणघातक हल्ल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातला भाजप शिवसेना यांच्यातल्या अंतर्गत वाद पुन्हा चर्चेत आला आहे. आपल्या हल्ल्यामागे भाजपच्या महिला नेत्या रश्मी बागल यांचा हात असल्याचा आरोप महेश चिवटे यांनी केलाय.
महेश चिवटे यांच्यावर हल्ल्यानंतर पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. करमाळ्यातील हिवरवाडी गावात सकाळी शेतात कामासाठी गेले असताना महेश चिवटे यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. महेश चिवटे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भाजपच्या महिला आघाडीच्या प्रमुख रश्मी बागल आणि त्यांचे भाऊ दिग्विजय बागल यांनी हा हल्ला घडवून आणला असल्याचा आरोप शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी केलाय. दिग्विजय बागल हे विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाकडून रिंगणात होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड