पुणे महापालिकेची प्रभाग रचना सोमवारपर्यंत जाहीर होणार
पुणे, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। पुणे महापालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली असून, ही प्रभाग रचना सोमवारपर्यंत जाहीर होणार आहे. हरकती सूचनांवर सुनावणी घेतली असली तरी प्रारूप प्रभाग रचनेतील हे बदल राजकीय सोय बघून होणार असल्याची
पुणे महापालिकेची प्रभाग रचना सोमवारपर्यंत जाहीर होणार


पुणे, 4 ऑक्टोबर (हिं.स.)।

पुणे महापालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली असून, ही प्रभाग रचना सोमवारपर्यंत जाहीर होणार आहे. हरकती सूचनांवर सुनावणी घेतली असली तरी प्रारूप प्रभाग रचनेतील हे बदल राजकीय सोय बघून होणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे अंतिम झालेल्या प्रभाग रचनेत महायुतीमधील कोणत्या पक्षाने कुरघोडी केली हे यातून स्पष्ट होणार आहे.

महापालिकेची आगामी निवडणुकीसाठी २०११ या वर्षाची लोकसंख्या गृहित धरुन प्रभागरचना करावी, अशा सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने ३४ लाख ८१ हजार ३५९ लोकसंख्या लक्षात घेत प्रभागरचना केली आहे. यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या ४ लाख ६८ हजार तर अनुसूचित जमातींची लोकसंख्या ४० हजार आहे.या लोकसंख्येच्या आधारे १६५ नगरसेवकांची निवड करण्यात येणार असून, यासाठी चार सदस्यांचे ४० आणि पाच सदस्यांचा एक असे मिळून ४१ प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. यावर ५ हजार ९२२ हरकती नोंदविण्यात आल्या होत्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande