नांदेड, 5 ऑक्टोबर, (हिं.स.)।
नांदेड येथील भारतीय जनता पार्टी च्या वतीने घेण्यात आलेल्या
कार्यशाळेत जीएसटीत झालेली दरकपात, पदवीधर निवडणूक नोंदणी व आत्मनिर्भर भारत संकल्प अभियानाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे मराठवाड्यातील नेते उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टीच्या नांदेड महानगर, दक्षिण ग्रामीण जिल्हा, उत्तर ग्रामीण जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची नांदेड येथे कार्यशाळा झाली.
यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री खा.डॉ. भागवत कराड, भाजपचे प्रदेश महामंत्री आ. संजय केनेकर, आ. डॉ. तुषार राठोड, नांदेड महानगरचे अध्यक्ष अमरनाथ राजूरकर, उत्तर ग्रामीणचे अध्यक्ष अॅड. किशोर देशमुख, दक्षिण ग्रामीणचे अध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis