अमरावती, 5 ऑक्टोबर (हिं.स.) : प्रादेशिक परिवहन अधिकारी, सेंट थॉमस चर्च, विभागीय आयुक्त कार्यालय, सहकार संकुल अशी लोकाभिमुख कार्यालये असलेल्या कॅम्प भागात बिबट आढळून आला आहे. त्यामुळे वन विभागाने त्या भागात पिंजरा बसविला असून नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आरटीओ कार्यालय आणि सेंट थॉमस चर्चच्या मध्ये असलेल्या जंगलसदृश परिसरात पिंजरा ठेवण्यात आला आहे. बिबट आपल्या भक्ष्याकडे आकर्षित व्हावा, म्हणून पिंजऱ्याला जोडून एक वेगळा लोखंडी जाळीचा डबा लावण्यात आला आहे. या डब्यात बकरी ठेवण्यात आली आहे. तिच्याकडे आकर्षित होऊन तो पिंजऱ्यात अडकेल. मात्र बकरीला काहीही होणार नाही, असे नियोजन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी