सत्ता असो वा नसो लोकसेवा करणार - क्षीरसागर
बीड, 5 ऑक्टोबर, (हिं.स.)। सत्ता असो या नसो लोकांची कामे करणे, लोकसेवा करणे ही माजी खासदार केशर काकूंची शिकवण आहे. तो वारसा आम्ही पुढे नेत असल्याचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी म्हंटले आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी काकूंच्या कार्य
अ


बीड, 5 ऑक्टोबर, (हिं.स.)।

सत्ता असो या नसो लोकांची कामे करणे, लोकसेवा करणे ही माजी खासदार केशर काकूंची शिकवण आहे. तो वारसा आम्ही पुढे नेत असल्याचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी म्हंटले आहे.

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी काकूंच्या कार्याला उजाळा देतांना म्हंटले. इ.स.1995-96 साली काकू खासदार असतांना रेल्वे बजेट दरम्यान खर्‍या अर्थाने अहिल्यानगर- बीड- परळी रेल्वेसाठी निधी पडला. काकूंनी अत्यंत प्रतिकृतपरिस्थितीत आम्हा सर्वांना तर वाढवलेच परंतू जगाचा रहाट गाडा ही चालवला. त्यांचे संस्कार, त्यंाचे कार्य पुढे नेण्याचे काम आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत.

बीड जिल्ह्याच्या माजी खा. स्व केशरकाकू क्षीरसागर यांच्या 19 व्या पुण्यस्मरणानिमित्त माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर आणि क्षीरसागर कुटुंबियांच्या वतीने स्व काकूंच्या समाधीवर नतमस्तक होऊन अभिवादन करण्यात आले.

यावेळी काकू-नाना प्रतिष्ठानच्या वतीने रामनाचार्य ह भ प रामराव ढोक महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले

होते. यावेळी जिल्हाभरातून काकूंचे चाहते अभिवादन साठी उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande