नांदेड - आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी पोहोचले आ. चिखलीकर
नांदेड, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातल्या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. त्या आत्महत्येचे दुःख सहन न झाल्याने वडिलांनी देखील प्राण सोडले होते. या कुटुंबीयांच्या भेटीसाठी लोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखली
अ


नांदेड, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातल्या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. त्या आत्महत्येचे दुःख सहन न झाल्याने वडिलांनी देखील प्राण सोडले होते. या कुटुंबीयांच्या भेटीसाठी लोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर पोहोचले आणि त्यांनी या कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे.

नांदेड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून ढगफुटी सदृश, अतिवृष्टीमुळे शेतातील उभ्या पिकांचा अक्षरशः चिखल झाला. हे नुकसान पाहून सहन न झाल्याने शेतकरी निवृत्ती सखाराम कदम (वय ४८ वर्षे) रा. कोंढा ता. अर्धापूर जि.नांदेड यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली व अवघ्या १२ तासातच वडील सखाराम कदम (वय -८०) यांनाही मुलाच्या घटनेची वार्ता कानी पडताच आपले प्राण सोडले, सदरील कुटुंबीयांना भेट देऊन सांत्वन केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाबुराव पाटील कोंढेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर कार्याध्यक्ष माधव पावडे, धर्मराज देशमुख, पप्पु पाटील कोंढेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल इंगळे, बाबुराव हेंद्रे, आत्माराम पाटील कपाटे, मुनीरभाई शेख यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande