बीड, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। जिल्ह्यातील श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अंदाजे 72 कोटी रुपयांच्या खर्चाचे भव्य मंदिर उभारले जाणार असल्याची माहिती आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी दिली.
ते म्हणाले की पुढील तीन ते साडेतीन वर्षांत पूर्ण करण्याचे ध्येय आहे. नाथ भक्तांच्या भावनांचा आदर राखत श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावरील मंदिर बांधकामासाठी भाविक मदत करीत आहेत. या मंदिरासाठी लागणारे दगड देगलूरहुन आणले असून त्यांचे घडवणे व बसविणे यासाठी मोठा खर्च अपेक्षित आहे. प्रत्येक दगडाचा आकार व किंमत वेगळी राहणार असून त्याची माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल.
आत्तापर्यंत काही भक्तांनी हजारो सिमेंटच्या गोण्या, तर काहींनी लाखो रुपयांची देणगी देत उदार सहकार्य केले आहे. या मंदिराचा पाया 100x150 फूट एवढा असून, 109 फूट उंच कळसावर नाथ संप्रदायाचा भगवा ध्वज फडकणार आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis