नांदेड, 5 ऑक्टोबर (हिं.स.)
अनुकंपा व एमपीएससीतून नियुक्त झालेल्या उमेदवारांनी शासनाच्या या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. अनेक कुटुंबांना या नियुक्त्यांमुळे आर्थिक दिलासा मिळाला. आदेश हातात मिळाल्यानंतर उमेदवारांच्या चेहऱ्यावर आनंदाचे अश्रू उमटले. यातील काही उमेदवारांच्या प्रतिक्रिया त्यांच्याच शब्दात मांडण्यात आल्या.
शासकीय नोकरीत असलेल्या कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यानंतर घरातील सर्व परिस्थिती बदलून जाते. अशा परिस्थितीत संकटावर मात करुन अनेक कुटूंबातील पत्नी, मुले अनुकंपा भरतीसाठी प्रयत्न करत होते. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविलेल्या 150 दिवसांच्या उपक्रमात या अनुकंपा व एमपीएससीतून निवड झालेल्या उमेदवारांना राज्यभरात नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात 378 उमेदवारांना मान्यवरांच्या हस्तेनियुक्ती आदेश दिले.
अनिल भगवान कलगुंडे म्हणाले,
माझे वडील जलसंपदा खात्यात चौकीदार पदावर कार्यरत होते. सन 2015 त्यांचे निधन झाले. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर होती. नोकरीसाठी अनेक ठिकाणी प्रयत्न करूनही अपयश येत होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राबविलेल्या अनुकंपा भरती उपक्रमामुळे मला ग्राम महसूल अधिकारी पदावर नियुक्ती मिळाली आहे. या नोकरीमुळे कुटुंब चालविण्यासाठी मोठा आधार मिळला असून समाजात आत्मसन्मानाने जगण्यासाठी बळ मिळाले आहे.
गजानन सोनबा बिलोलीकर म्हणाले, मी असर्जन कॅम्प नांदेड येथील असून मला अनुकंपावर नियुक्ती मिळाली आहे. माझे वडील शिपाई या पदावर कार्यरत होते. त्यांचे सन 2006 मध्ये निधन झाले,
बालाजी शेळके हे
लिपिक टंकलेखक पदासाठी एमपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होवून लातूर येथे कृषी विभागात रुजू झाले आहेत.
शिवाजी देविदास चव्हाण
यांचे वडील जलसंपदा विभागात मजूर या पदावर होते. त्यांचे सन 2012 मध्ये निधन झाले. त्यांच्या वडिलाच्या जागेवर नियुक्ती मिळण्याबाबत शिवाजी चव्हाण यांनी अनुकंपाधारकाचा प्रस्ताव दाखल केला होता.
त्यांना आता नोकरी मिळाली.
शिवराज गंगाधर येसिमोड
रा. मंगनाळी, ता. कंधार पंचायत समिती, मुखेड येथे त्यांचे वडील ग्रामसेवक होते. सन 2020 मध्ये त्यांचे वडील वारले आमच्या कुटूंबावर खूप मोठे संकट आले.
लक्ष्मण ऊईके,
मु.पो. जवरला, ता. किनवट येथील राहणार असून माझी आई शासनाच्या प्रकल्प कार्यालयात नोकरीला होती. सन 2024 मध्ये आईचे निधन झाले. नियुक्ती आदेशाच्या माध्यमातून मला आईची सावली व भाकरी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.
नांदेड येथील नेहल सुनिल कोटगिरे यांचे वडील नांदेड महानगरपालिकेत वरिष्ठ लिपिक पदावर पाणीपुरवठा विभागात कार्यरत होते. त्यांचे सन 2023 मध्ये कर्करोगामुळे निधन झाले.
हदगाव येथील कृष्णा पांडुरंग कदम यांचे वडील अधीक्षक अभियंता यांत्रिकी मंडळ नांदेड येथे कार्यरत होते. त्यांच्या वडिलांचे सन 2014 साली निधन झाले. त्यांची घरची परिस्थिती बिकट असल्याने कृष्णा कदम हे नोकरीच्या शोधामध्ये गेल्या सात-आठ वर्षांपासून प्रयत्न करत होते.
पुजा मुकेश डोईजड
यांची नांदेड महानगरपालिकेत अनुकंपा अंतर्गत शिपाई पदावर निवड झाली. त्यांचे पती नांदेड महानगरपालिकेत शिपाई पदावर कार्यरत होते. त्यांना दोन अपत्य असून त्यांच्या सोबत त्यांच्या सासू राहतात. त्यांच्या घरात कोणीही कमवता व्यक्ती नव्हता. त्यांच्या सासुबाई घरोघरी काम करुन घर चालवत असत. आता नौकरी मिळाल्यामुळे अडचणी दूर झाल्याचे मत पुजा डोईजड यांनी व्यक्त केले.
नांदेड येथील पुजा मुंजाजी घोगरे यांची एमपीएससी अंतर्गत लातूर विभागांतर्गत सहनिबंधक संस्था कार्यालयात लिपिक टंकलेखक या पदावर निवड झाली आहे.
देगलूर येथील निशिगंधा प्रमोद पांपटवार यांची अनुकंपा अंतर्गत मुखेड नगरपरिषदेत लिपिक टंकलेखक पदावर निवड झाली. त्याबद्दल त्यांनी राज्य शासनाचे आभार मानले. निशिगंध पांपटवार यांच्या वडिलांचे सन 2009 मध्ये निधन झाले. त्यांचे वर्ग 4 च्या पदासाठी नाव आले होते. परंतू वर्ग 3 पदासाठी आवश्यक असणारे शिक्षण पूर्ण झाल्याने त्यांना राज्य शासनाच्या 150 दिवसाच्या उपक्रमात अनुकंपातत्वावर वर्ग 3 मधील लिपिक टंकलेखक या पदावर नियुक्ती आदेश मिळाले.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis