नांदेड : बहादरपुरा पुल रस्ता ते बिजेवाडी फाटा मार्गावर जड वाहनाची वाहतूक करण्यास प्रतिबंध
नांदेड, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। कंधार तालुक्यात मन्याड नदीवरील बहादरपुरा पुल रस्ता ते बिजेवाडीफाटा मार्गावर जड वाहनाची वाहतूक करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. या मार्गावरील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कंधार-घोडज मार्गे फुलवळ हा राहील. याबाबत मोटार वाहन
Q


नांदेड, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।

कंधार तालुक्यात मन्याड नदीवरील बहादरपुरा पुल रस्ता ते बिजेवाडीफाटा मार्गावर जड वाहनाची वाहतूक करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. या मार्गावरील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कंधार-घोडज मार्गे फुलवळ हा राहील. याबाबत मोटार वाहन कायदा 1999 चे कलम 115 मधील तरतुदीनुसार जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी अधिसूचना निर्गमीत केली आहे.

संबंधित विभागाने दिलेल्या उपाययोजना करुन 26 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर या कालावधीपर्यंत मन्याड नदी-बहादरपुरा पुल रस्ता ते बिजेवाडी हा मार्ग जड वाहनाच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. कंधार-घोडज मार्गे फुलवळ या पर्यायी मार्गाने वाहने वळविण्यास मान्यता देण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक नांदेड यांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. रस्ता वाहतुक प्रतिबंध व पर्यायी रस्त्यासाठी आवश्यक असलेले बोर्ड, चिन्ह लावणे इत्यादी बाबतची कार्यवाही कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाने करावी, असेही अधिसुचनेत स्पष्ट केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande