नांदेड जिल्हा बँकेच्या संभाव्य बोगस भरती प्रक्रियेस स्थगिती
नांदेड, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संभाव्य बोगस भरती प्रक्रियेस स्थगिती मिळाली असल्याची भाजपा आमदार राजेश पवार यांनी आज सांगितले आहे. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये बोगस नोकर भरतीचा अनेक जणांनी मिळून प्लॅन केला
अ


नांदेड, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संभाव्य बोगस भरती प्रक्रियेस स्थगिती मिळाली असल्याची भाजपा आमदार राजेश पवार यांनी आज सांगितले आहे.

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये बोगस नोकर भरतीचा अनेक जणांनी मिळून प्लॅन केला होता. याविरुद्ध आवाज उठवून भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने व्हावी आणि तोपर्यंत सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियेस स्थगिती देण्यात यावी, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. भरती प्रक्रिया निविदा ते उमेदवार निवड ही प्रक्रिया नियमबाह्य असल्याचे या निवेदनाद्वारे त्यांच्या निदर्शनास आणून दिले.

या नोकर भरतीमध्ये केवळ आर्थिक देवाणघेवाण करुन उमेदवार निवड होणार होती आणि याद्वारे अभ्यासू, हुशार व पात्र उमेदवारांवर अन्याय होणार होता. नेमकी हीच बाब मुख्यमंत्री फडणवीस यांच्या लक्षात आणून दिल्याने मागणीची तत्काळ दखल घेऊन मुख्यमंत्री महोदयांनी संबंधित विभागाला सदरील बोगस नोकर भरतीला स्थगिती दिली आहे.

जिल्ह्यामध्ये कोणत्याही पक्षाची व्यक्ती सर्वसामान्यांच्या हिताच्या आड येत असेल, नियमबाह्य काम करत असेल तर अशा प्रसंगी यापुढेही सदैव आवाज उठविणार आहे, असे आमदाराने सगितले

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande