भारतासोबत युद्ध झाल्यास आता मागे हटणार नाही - पाकिस्तानी सैन्य
इस्लामाबाद, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।“जर आता दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू झाले तर त्याचा परिणाम भयंकर विनाशकारी होईल. जर शत्रुत्वाचा एक नवीन टप्पा सुरू झाला तर पाकिस्तान मागे हटणार नाही. आम्ही संकोच न करता प्रत्युत्तर देऊ,” असा इशारा देत शनिवारी (दि.४) पाक
भारतासोबत युद्ध झाल्यास आता पाकिस्तान मागे हटणार नाही - पाकिस्तानी सैन्य


इस्लामाबाद, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।“जर आता दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू झाले तर त्याचा परिणाम भयंकर विनाशकारी होईल. जर शत्रुत्वाचा एक नवीन टप्पा सुरू झाला तर पाकिस्तान मागे हटणार नाही. आम्ही संकोच न करता प्रत्युत्तर देऊ,” असा इशारा देत शनिवारी (दि.४) पाकिस्तानी सैन्याने भारताच्या ‘पाकिस्तानला नकाशावरून मिटवण्याच्या’ विधानावर पहिली प्रतिक्रीया दिली.

पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया विंग आयएसपीआरने शनिवारी एक अधिकृत निवेदन जारी केले आहे की, भारतीय संरक्षण मंत्री आणि लष्करी अधिकाऱ्यांची बेजबाबदार विधाने आक्रमकता भडकवण्याचा प्रयत्न आहे. यामुळे दक्षिण आशियातील शांतता आणि स्थैर्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

पाकिस्तानला नकाशावर राहायचे की नाही याचा विचार करावा लागेल या लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्या विधानालाही त्यांनी उत्तर दिले, ते म्हणाले की, पाकिस्तानला नकाशावरून मिटवण्याच्या कल्पनेचा विचार केल्यास, भारताला हे माहित असले पाहिजे की जर अशी परिस्थिती उद्भवली तर दोन्ही बाजू नष्ट होतील.

पाकिस्तानी सेनानं पुढे म्हटले की जे लोक नवीन नियम बनवण्याचा विचार ठेवतात, त्यांनी समजून घ्यावे की पाकिस्तानने आता नवीन पद्धत अवलंबिली आहे. ही पद्धत वेगवान, निर्णायक आणि विनाशकारी असेल. पोकळ धमक्या आणि अनियंत्रित हल्ल्यांचा सामना करताना पाकिस्तानच्या जनतेकडे आणि सशस्त्र दलांकडे शत्रूच्या प्रत्येक प्रदेशात लढण्याची क्षमता आणि निर्धार आहे. या वेळी आम्ही भौगोलिक सीमांच्या मागे लपण्याच्या समजुतीला मोडून टाकू आणि भारतीय प्रदेशातील सर्वात दूरच्या भागांपर्यंत पोहोचू. पाकिस्तानला नकाशावरून मिटवण्याची बाब असली तरी भारताने जाणून घ्यावे की अशा परिस्थितीचे परिणाम दोन्ही बाजूंना होतील.

दरम्यान , भारताचे जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शुक्रवारी(दि.३) सांगितले की पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवायला हवे, जर तो जागतिक नकाशावर आपली जागा टिकवून ठेवू इच्छित असेल. यापूर्वी एका दिवशी रक्षा मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटले होते की भारताला आवश्यकता भासली तर आपल्या सुरक्षेसाठी कोणतीही सीमा ओलांडता येईल.

जनरल द्विवेदी यांनी हेही सांगितले की ऑपरेशन सिंदूर दरम्यान दिल्लीने जो संयम दाखवला तो भविष्यातील कुठल्याही युद्धात पुन्हा करणार नाही. त्यांनी भारतीय सैनिकांना सतर्क राहण्याचे आणि युद्धासाठी तयार राहण्याचे आवाहन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande