बीड - श्री संत सद्गुरु बाळूमामा यांचा 133वा जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न
बीड, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील पिठ्ठी येथ श्री संत सद्गुरु बाळूमामा यांचा 133वा जन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातील पिठी येथे प्रतिवर्षी जन्मोत्सव सोहळा साजरा होतो या सोहळ्यासाठी
अ


बीड, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील पिठ्ठी येथ

श्री संत सद्गुरु बाळूमामा यांचा 133वा जन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला.

विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातील पिठी येथे प्रतिवर्षी जन्मोत्सव सोहळा साजरा होतो या सोहळ्यासाठी आजूबाजूच्या गावातील लोकांची मोठी गर्दी होते.

पाटोदा तालुक्यातील पिठ्ठी येथे आयोजित सोहळ्यास जयदत्त धस यांनी उपस्थित राहून सद्गुरु बाळूमामा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.

भक्तिमय वातावरणात जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

या प्रसंगी .सरपंच नारायण तात्या भोंडवे, उपसरपंच केशव भोंडवे,ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब खोमणे, महेश भोंडवे,बाळासाहेब ढोरे ,गणप्रमुख अशोक सुपेकर, राजेभाऊ भोंडवे ,सुनील इंगळे, अमोल कदम गोरख कुडके पाटील, रामेश्वर गाडे, राजाभाऊ कुडके,ऋषि इंगोले इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande