आनंदाचा शिधा संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीनंतरच चित्र स्पष्ट होणार- मिटकरी
अकोला, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।राज्यातील शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य जनतेला दिवाळीत आनंदाचा शिधा मिळणार की नाही, याबाबतची स्पष्टता उद्या होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर होणार आहे. या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रति
आनंदाचा शिधा संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीनंतरच चित्र स्पष्ट होणार- मिटकरी


अकोला, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।राज्यातील शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य जनतेला दिवाळीत आनंदाचा शिधा मिळणार की नाही, याबाबतची स्पष्टता उद्या होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर होणार आहे. या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.आनंदाचा शिधा दिवाळीत मिळणार नाही ही बातमी कितपत खरी आहे हे कॅबिनेटच्या उद्याच्या बैठकीनंतरच स्पष्ट होणार असून राज्य सरकारच्या महत्त्वाच्या बैठकीत यावर निर्णय घेतला जाणार असल्याचही मिटकरी म्हणाले तर निधीचे प्रावधान झाल्यानंतरच या विषयावर अधिक बोलणे योग्य ठरेल असे ही मत मिटकरी यांनी मांडले.तसेच शेतकऱ्यांची दिवाळी कडू होणार नसून उलट शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल असे मिटकरी यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande