अकोला, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। सरन्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर एका वकिलाने कथितपणे जोडा फेकण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज, सोमवारी
घडली. या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी निषेध केलाय.
यासंदर्भात मिटकरी म्हणाले की, . ही घटना अतिशय निंदनीय असून अशा विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी, आरोपी वकिलाची सनद तात्काळ रद्द करण्यात यावी आणि त्यांच्या विरोधात देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत . सर्वोच्च न्यायालयात बहुजन समाजातील व्यक्ती सर्वोच्च पदावर असल्याचा राग मनात धरून तिवारी यांनी हे अमानुष कृत्य केले असावे, असा आरोपही मिटकरी यांनी केला.दरम्यान, या घटनेनंतर समाजात कोणताही तणाव निर्माण होऊ नये, यासाठी सर्वांनी संयम बाळगावा, अशी विनंतीही आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे