अकोल्यात भव्य दिवाळी प्रदर्शन शुक्रवारपासून, 
अकोला, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। महिला सक्षमीकरण आणि स्वदेशी वापराचा संदेश देत, ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प आणि निलेश देव मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आपली दिवाळी, आपल्या लोकांकडून’ या संकल्पनेखाली तीन दिवसीय भव्यदिव्य प्रदर्शनी व विक्रीच
अकोल्यात भव्य दिवाळी प्रदर्शन शुक्रवारपासून, 


अकोला, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। महिला सक्षमीकरण आणि स्वदेशी वापराचा संदेश देत, ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प आणि निलेश देव मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आपली दिवाळी, आपल्या लोकांकडून’ या संकल्पनेखाली तीन दिवसीय भव्यदिव्य प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. ही प्रदर्शनी शुक्रवार, दि. १० ऑक्टोबर ते रविवार, दि. १२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत, दररोज सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत कोल्हटकर मंगल कार्यालय, शंकर नगर, अकोला येथे भरविण्यात येणार आहे.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश महिला उद्योजिकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि स्थानिक स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देणे हा आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी ऑनलाईनऐवजी आपल्या परिसरातील महिलांकडून दिवाळी खरेदी करावी, असा प्रेरणादायी संदेश या प्रदर्शनातून देण्यात येत आहे. या प्रदर्शनात फॅशन, ज्वेलरी, रेडिमेड गारमेंट्स, कॉस्मेटिक्स, क्राफ्ट वस्तू, बॅग्ज, पर्सेस, गृहसजावटीच्या वस्तू, लेडीज गिफ्ट आयटम्स, रांगोळ्या, तोरणे, खाद्यपदार्थ आणि घरगुती वस्तू अशा विविध वस्तूंचा समावेश आहे. नागरिकांना दैनंदिन वापरापासून पारंपरिक कलावस्तूपर्यंत सर्व प्रकारच्या वस्तू येथे एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. महिलांच्या उद्यमशीलतेला बळकटी देण्यासाठी आणि ‘स्वदेशी खरेदी’चा संदेश दृढ करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. जठार पेठ, रामदास पेठ, न्यू तापडिया नगर, तापडिया नगर, उत्तरा कॉलनी, गुप्ते रोड आणि शंकर नगर परिसरातील नागरिकांनो, आपली दिवाळी, आपल्या महिलांकडून साजरी करूया! स्वदेशी वापरूया, महिला सशक्तीकरणाला हातभार लावूया! हा उपक्रम अकोल्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक सक्षमीकरणाचा दीप उजळवणारा ठरणार आहे, असा विश्वास ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प आणि निलेश देव मित्र मंडळ यांनी व्यक्त केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande