अकोला, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।
अकोल्याच्या पातुर तालुक्यातील सस्ती येथे तीन अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत संतोष इंगळे यांची दुचाकी चोरी केली. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मध्यरात्री सुमारास सनराईस शाळेजवळील घरासमोर ही घटना घडली.चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात स्पष्टपणे कैद झाले. तपासात समोर आले की, त्यांनी आधी बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथून दुचाकी चोरी करून सस्ती येथे आणली होती. एका नवीन बांधकामात चोरी करण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्यामुळे त्यांनी चोरी केलेली दुचाकी तिथेच सोडली आणि इंगळे यांची दुचाकी लंपास केली. चान्नी पोलीस ही घटना लक्षात घेऊन तपास सुरू केला असून, चोरट्यांचा शोध घेत आहेत.तर याबाबतची व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे