अकोला, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।
आज काँग्रेसच्या अमरावती विभागीय आढावा बैठकीत पातूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष हिदायत खान रूम खान यांनी अनेक प्रमुख पदाधिकारी, आजी माजी नगर परिषद सदस्य, ग्राम पंचायत सदस्य यांच्यासमवेत आपल्या शेकडो समर्थकांसह प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याहस्ते काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश घेतला. त्यांच्या या जंगी पक्ष प्रवेशाने पातूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुरुंग लागला असल्याचे दिसून येत आहे.
पातूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष हिदायत खान रूम खान यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश घेतला. हिदायत खान रूम खान ही नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष असून चार वेळा नगरसेवक पद, एकवेळा उपाध्यक्ष पद आणि विदर्भात नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वात जास्ती जागा त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली निवडून आणल्याचा त्यांना भूषण प्राप्त आहे. त्यांच्या काँग्रेस प्रवेशाने पातूर नगर परिषदेवर यंदा काँग्रेसची सत्ता येण्याची दाट शक्यता राजकीय सूत्र वर्तवित आहे.
यावेळी त्यांच्या समवेत प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शेकडो समर्थक, कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे