अकोला, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित भव्य सभेत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, “लोकप्रतिनिधी आणि नेत्यांना गावबंदी केली तर सरकार कर्जमुक्ती केल्या शिवाय राहणार नाही.” यावेळी त्यांनी शासनाकडे अनेक ठोस मागण्या मांडल्या. अकोला जिल्हा तात्काळ ओला दुष्काळग्रस्त घोषित करून प्रति हेक्टरी ५००० रुपये मदत द्यावी, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली. तसेच शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती, जुनी पिकविमा पद्धत पुन्हा लागू करणे, सोयाबीनला ८००० रुपये आणि कापसाला १२००० रुपये हमीभाव, २०२३–२४ मधील थकीत पिकविमा रक्कम तत्काळ देणे, तसेच स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत शेतमजुरांचा समावेश करावा, अशा मागण्या त्यांनी मांडल्या.या सभेला परिसरातील शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती लाभली. तुपकर यांच्या भाषणादरम्यान घोषणाबाजी व उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं.
नेपाळमध्ये जस मंत्र्यांना तुडवल तसं...
राज्यशासनाने केंद्राकडे पीक नुकसानीचा अहवाल अजून पाठवला नाही. शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे, मुलांची लग्न होत नाहीत. नेपाळमध्ये जस मंत्र्यांना मारलं तसा प्रकार महाराष्ट्रातही घडू शकतो, असा पुन्हा एकदा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिलाय. ते अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील गाजीपुर येथील जाहीर सभेसाठी आले असताना माध्यमांशी बोलत होते. सरकार शेतकऱ्यांच्या विरोधाच आहे, यांना उद्योगपतीशी देने घेणे आहे. पण यांचे 100 अपराध पूर्ण झाले आहे. पण आम्ही मरू तर यांनाही घेऊन जाणार आहे. असा थेट इशाराही तुपकरांनी सरकारला दिलाय. सोयाबीन सोंगणी झाल्यावर महाराष्ट्रात मोठं आंदोलन पेटणार असल्याचंही तुपकर म्हणाले.
तुम्ही शेतातील रानडुकरं हाणा...
तुपकर यांनी राजकारण्यांना रानडुक्कर म्हटल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तुपकर म्हणाले, शेतीतील रानडुक्कर तुम्ही हाकला मी राजकारणातील मस्ती आलेले रान डुक्कर हाणतो. तर इंग्रजांच्या विरोधात लढणं सोपी होतं ती औलाद भोळी होती मात्र यांच्या विरोधात लढणं कठीण आहे. हे आपलेच आहेत. असेही तुपकर म्हणाले तर तुमच्या स्थानिक आमदाराला तुम्ही सात बारा कोरा बाबत का विचारत नाही. उलट तुम्ही त्यांचे वाजत गाजत स्वागत करता. आमच्या बापाची तुम्ही जिरवली आमची पण जिरवा अशा शब्दांत तुपकर यांनी निशाणा साधला. जेल मध्ये जाणं आणि पोलीस केस होणं ही काही मोठी गोष्ट नाही मर्दांगी चे काम आहे. माझे तर सध्या फोन टॅप केले जात आहेत. तरी मी घाबरणार नाही. आपल्या काही भानगडी नाहीत. असेही तुपकर म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे