नाशिक : येवला येथे मुख्याधिकारी आहेराच्या हस्ते आयुष्मान भारत कार्डचे वाटप
येवला, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत येवला नगरपरिषदेच्या वतीने विशेष लाभार्थी कार्ड वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्या हस्ते
मुख्याधिकारी आहेराच्या हस्ते आयुष्मान भारत कार्ड वाटप कार्यक्रम


येवला, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत येवला नगरपरिषदेच्या वतीने विशेष लाभार्थी कार्ड वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्या हस्ते लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्ड वाटप करण्यात आले. या योजनेद्वारे नागरिकांना वार्षिक पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत आरोग्य विमा संरक्षण मिळणार असून, उपचारासाठी शासकीय व मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयात रोख रक्कम न देता सुविधा मिळणार आहेत.मुख्याधिकारी आहेर यांनी सांगितले की, “प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत या योजनेचा लाभ पोहोचविणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. नागरिकांनी स्वतःचे व कुटुंबाचे आयुष्मान कार्ड तात्काळ काढून घ्यावे.” यावेळी समुदाय संघटक सौ सुषमा विखे यांनी उपस्थित नागरिकांना प्रधानमंत्री स्वनिधी तर नितीन आहेर यांनी प्रधानमंत्री घरकुल योजना याबाबत नागरिकांना माहिती दिली तसेच संदीप बोढरे यांनी येवला नगरपरिषदेमार्फत नागरिकांना दिले जाणारा विविध योजना बाबत माहिती दिली.या कार्यक्रमात नगरपरिषदचे पर्यावरण दूत डॉक्टर गोविंद भोरकडे पर्यावरण दूत अनुपमा नढे कोमल कडतन वैशाली चव्हाण प्रभाकर वाघ व अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी NULM विभागातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande