लातूर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।
आज लातूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, लातूर येथे बंजारा (लमाण) समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गाचे आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी समाज बांधवांनी विराट मोर्चा काढला.
बंजारा समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी काढण्यात आलेल्या मोर्चात आमदार तुषार राठोड यांनी सहभागी होऊन त्यांच्या मागणीला जाहिर पाठिंबा दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेऊन आपल्या बंजारा समाजाची भावना व याबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रातील बंजारा समाजाच्या हक्कासाठी लढणाऱ्या विविध सामाजिक संघटनेचे प्रमुख व राजकीय नेत्यांसोबत बैठकीचे आयोजन लवकरात लवकर करावे अशी विनंती केली आहे.
तसेच या मागणीसाठी राज्य सरकारने स्वतंत्र विशेषाधिकार समिती लवकरात लवकर स्थापन करावी, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन विनंती केली आहे.
यापुढेही संविधानाच्या चौकटीत राहून या मागणीसाठी मोठ्या स्वरूपात लढा उभा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले
यावेळी आमदार राजेश राठोड, रामराव राठोड, अशोक राठोड, विजय चव्हाण, श्रेयस चव्हाण, उत्तम चव्हाण, माधव राठोड, सुधीर चव्हाण, शिवाजी राठोड, राजू राठोड, सचिन पवार सह बंजारा एसटी आरक्षण कृती समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व लातूर जिल्हातील सकल बंजारा समाज बांधव आणि माता-भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis