जागतिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नांव नोंदणी चे आवाहन.
गडचिरोली., 6 ऑक्टोबर (हिं.स.) जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षानी आयोजित होणारी जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून त्याचा 48 वी जागतिक कौशल्य स्पर्धा ‍दिनांक.22 ते 27 सप्टेंबर 2026 दरम्यान शांघाई ( चीन ) येथ
जागतिक  स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नांव नोंदणी चे आवाहन.


गडचिरोली., 6 ऑक्टोबर (हिं.स.)

जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षानी आयोजित होणारी जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून त्याचा 48 वी जागतिक कौशल्य स्पर्धा ‍दिनांक.22 ते 27 सप्टेंबर 2026 दरम्यान शांघाई ( चीन ) येथे होणार आहे. एकुण 63 कौशल्य क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातील 23 वर्षाखालील तरूण - तरूणी करीता त्याच्यांतील पारंगत कौशल्याची निवड करून सादरीकरण करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धाचे आयोजन करण्यांत येणार आहे. या स्पर्धेमध्ये विजेता झालेल्या पात्र उमेदवरांची विभागीय स्तरावरच्या कौशल्य स्पर्धेमध्ये नामांकन नंतर राज्य स्तरावरच्या कौशल्य स्पर्धेमध्ये नामांकन करण्यांत येईल.

त्याकरीता गडचिरोली जिल्हयातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था ,पॉलिटेक्नीक कॉलेज , कौशल्य प्रशिक्षण संस्था, सर्व व्यवसाय प्रशिक्षण संस्था, कौशल्य प्रशिक्षण संस्था ,फाईन आर्टस कॉलेज, औद्योगिक संघटना , वाणिज्य संघटना, पर्यटन संस्था व सर्व महाविद्यालयामधील सर्व शाखेतील इच्छुक विद्यार्थ्यांनी जागतिक कौशल्य स्पर्धेकरीता जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेमध्ये वैयक्तिक किंवा सामुहीक पध्दतीने सहभागी होण्यासाठी https://www.skillindiadigital.gov.in/account/register?returnUrl=%2Findia-skills-2025 या संकेतस्थळाच्या लिंकवर भेट देवून तसेच काही कारणास्तव या Link मधून आपण Back झाल्यास home page वरील indiaskills2025 हा Tab निवडून Learner/Participant या पर्यायावरून नोंदणीची प्रक्रिया सूरू करावी. ( Aadhar Details - Personal Details - Address Details - Education Details - Submit इ.पर्यायाची माहिती भरणे अनिवार्य ) तसेच Personal Details मधील Your Skill या पर्यायातील एकुण 63 कौशल्य क्षेत्रापैकी उमेदवार स्वत: पारंगत / कुशल असलेल्या एका योग्य Skill Category ची निवड करून उमेदवारांनी दिनांक. 15 ऑक्टोंबर, 2025 पर्यंत जास्तीत जास्त नांव नोंदणी करावे. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे, सहायक आयुक्त योगेंद्र शेंडे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande