देशाच्या एकतेसाठी संपूर्ण समाजाला एकत्र येऊन संकल्प करण्याची गरज आहे – प्रदीप जोशी
चंद्रपूर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। देशात एकसुत्रता, एकता, वाढतांना दिसत आहे, समाजातील अनेक लोक यासाठी प्रयत्न करतांना दिसत आहे यामुळे समाजाच्या मनात आत्मविश्वास वाढत आहे. जगामध्ये भारत गतीने समोर जातांना दिसत आहे. काही राक्षसी शक्ती या जगात अजूनही क
देशाच्या एकतेसाठी संपूर्ण समाजाला एकत्र येऊन संकल्प करण्याची गरज आहे – प्रदीप जोशी


चंद्रपूर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।

देशात एकसुत्रता, एकता, वाढतांना दिसत आहे, समाजातील अनेक लोक यासाठी प्रयत्न करतांना दिसत आहे यामुळे समाजाच्या मनात आत्मविश्वास वाढत आहे. जगामध्ये भारत गतीने समोर जातांना दिसत आहे. काही राक्षसी शक्ती या जगात अजूनही काम करत आहेत जे नवीन नवीन अडचणी निर्माण करून भारताला अडवण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे. अशा सर्व येणाऱ्या प्रासंगिक - अप्रासंगिक विरोधाच्या प्रयत्नाला केवळ शासन नाही तर संपूर्ण समाजाला एकत्र येऊन संकल्प करण्याची गरज आहे. असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह प्रचार प्रमुख प्रदीप जोशी यांनी केले.

रा. स्व. संघाच्या शताब्दी वर्षातील चंद्रपूर नगर शाखेचा श्री विजयादशमी उत्सव स्थानिक तुकूम परिसरातील पोलिस फुटबॉल मैदानात मोठ्या थाटात पार पडला. यावेळी प्रदीप जोशी बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ पुरुषोत्तम सातपुते, जिल्हा संघचालक तुषार देवपुजारी, तालुका संघचालक अॅड. लक्ष्मण ओलालवार व नगर संघचालक अॅड. रवींद्र भागवत उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी नगरातून पथसंचलन काढण्यात आले होते.

प्रदीप जोशी म्हणाले, आमचे हिंदुत्व संविधान संमत आहे, हे समाजाला सांगण्याची गरज आहे आचार्य चाणक्य, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आदींच्या समाजाविषयीच्या चिंता दूर करण्याचे काम संघ करीत आहे. पूर्वी सामाजिक, सांस्कृतिक स्तरावर विश्वात हिंदूंची प्रतिमा फार आश्वस्त करणारी नव्हती. परंतु, आता हिंदू जागृत झाला आहे. जाती, पंथ, भाषा, प्रांत या पलीकडे जाऊन हिंदू संघटित झाला आहे. संघ आता पुढे काय करणार, असा प्रश्न समाजाला पडणे स्वाभाविक आहे. संघ यापुढेही संघकार्याचा विस्तार आणि गुणात्मक्ता यावर भर देणार आहे.

शस्त्रपूजनानंतर स्वयंसेवकांनी योगासन, नियुद्ध, दंडक्रमिका, सामूहिक समता, घोष, सांघिक व्यायाम, योग प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी संघाच्या पूर्ण गणवेषात, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह शहरातील गणमान्य नागरिक व स्वयंसेवक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande