छत्रपती संभाजीनगर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ इ छत्रपती संभाजीनगर ते पैठण या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरु असल्याने याठिकाणची रहदारी पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. दि.१८ पर्यंत ही वाहतुक याच पर्यायी मार्गाने होणार आहे.
रहदारीतील बदल याप्रमाणे-
१. कचनेर-निजलगाव-बिडकीन डीएमआयसी- निजलगाव फाटा, बिडकीन मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहने कचनेर- निजलगाव- बिडकीन डीएमआयसी एन्ड्युरन्स कंपनीजवळून- शेकटा फाटा- बिडकीन मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे जाईल.
२. छत्रपती संभाजीनगर- निजलगाव फाटा- बिडकीन- निजलगाव फाटा- बिडकीन डीएमआयसी- निजलगाव मार्गे कचनेरकडे जाणारी वाहने छत्रपती संभाजीनगर-निजलगाव फाटा-बिडकीन –शेकटा फाटा- एन्ड्युरन्स कंपनी जवळून- बिडकीन डीएमआयसी – निजलगाव मार्गे कचनेरकडे जातील.
३. वाळूज- शेंदुरवादा- शेकटा- शेकटा फाटा- बिडकीन- निजलगाव फाटा- बिडकीन डीएमआयसी- निजलगाव मार्गे कचनेरकडे जाणारी वाहने; वाळूज- शेंदुरवादा- शेकटा- शेकटा फाटा- एनड्युरन्स कंपनी जवळून- बिडकीन डीएमआयसी- निजलगाव मार्गे कचनेरकडे जातील.
४. कचनेर- निजलगाव-बिडकीन डीएमआयसी- निजलगाव फाटा- बिडकीन- शेकटा फाटा- शेकटा- शेंदुरवादा मार्गे वाळूज कडे जाणारी वाहने; कचनेर- निजलगाव- बिडकीन डीएमआयसी- एनड्युरन्स कंपनी जवळून- शेकटा फाटा- शेकटा- शेंदुरवादा मार्गे वाळूजकडे जातील.
दि.१८ पर्यंत हे बदल लागू राहतील. प्रतिबंधीत केलेल्या मार्गावर वाहनांची ये- जा बंद करण्यात आली आहे, असे पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis