त्र्यंबकेश्वर, 6 ऑक्टोबर (हिं.स.) स्वामी सागरानंद सरस्वती महाराज यांचे तिसरे पुण्यस्मरण आज समाधी पूजन किर्तन सत्संग महाप्रसाद यातून साजरे झाले. यावेळी भक्तांचा समुदाय उसळला होता.सकाळी समाधीची पूजा पादुकांची पूजा नंतर प्रसिद्ध कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांचे कीर्तन सत्संग शेवटी महाप्रसाद भंडारा असे झाले. आगामी सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेता आज स्वामी सदानंद सरस्वती महाराज हे असायला हवे होते. अशी आठवण वक्त्यांनी पुण्यस्मरण कार्यक्रमात काढली. संग्राम बापू भंडारे यांनी ब्रह्मलीनलिन स्वामी सागरानंद महाराजांचे कार्य सांगून आजच्या समाजात विश्वकल्याण आणि माणसात स्वाभिमान निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी स्टेजवर श्री पंचायती आनंद आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष महंत शंकरानंद सरस्वती महाराज गणेशानंद सरस्वती महाराज रामकृष्ण महाराज लहवितकर , महामंडलेश्वर सोमेश्वरानंद सरस्वती महाराज गट्टे महाराज आदी सह मान्यवर उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष कैलास घुले यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी देखील समाधी दर्शन घेतले.कार्यक्रम सोहळा यशस्वीतेसाठी श्री पंचायती आनंदा आखाड्याचे साधू महंत तसेच स्वामी सागरानंद आश्रम गुरुकुल सेवा यांचे कीर्तनकार सेवक यांनी परिश्रम घेतले. गिरीजानंद सरस्वती महाराज ,केशवानंद योगानंद, रामानंद, सर्वानंद, तसेच स्वामी सदानंद महाराजांचे भक्त यांनी परिश्रम घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV