नाशिक जिल्हा ज्युनियर गटाच्या कॅरम स्पर्धा आणि निवड चाचणी उत्साहात
नाशिक, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। नाशिक जिल्हा कॅरम असोसिएशनच्या वतीने आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या सहकार्याने नाशिकच्या मिनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथे रविवार दिनांक ०५ ऑक्टोबर, २०२५ रोजी १८ वर्षे आणि २१ वर्षे वयो
जिल्हा ज्युनियर गटाच्या कॅरम स्पर्धा आणि निवड चाचणी उत्साहात संपन्न ,राज्य स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड.


नाशिक, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। नाशिक जिल्हा कॅरम असोसिएशनच्या वतीने आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या सहकार्याने नाशिकच्या मिनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथे रविवार दिनांक ०५ ऑक्टोबर, २०२५ रोजी १८ वर्षे आणि २१ वर्षे वयोगट मुले आणि मुली यांच्या जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा आणि निवड चांचणीचे आयोजन करण्यात आले होते. ०५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता या स्पर्धेला प्रारंभ होईल. या स्पर्धेत नाशिकमधील विविध शाळा , महाविद्यालयाच्या ९२ खेळाडूंनी सहभाग नोंदवला.

या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे १८ वर्षे गटामध्ये पहिल्या सहा खेळाडूंची तर २१ वर्षे वयोगटामध्ये प्रत्तेकी दोन खेळाडूंची राज्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या निवड झालेल्या खेळाडूंचे सराव शिबीर आज दिनांक सहा ते १२ ऑक्टोबर दरम्यान कॅरम हॉलमध्ये होणार आहे. त्यानंतर निवड झालेले मुले दिनांक १४ ऑक्टोबर रोजी आणि मुली दिनांक १५ ऑक्टोबर, २०२५ दरम्यान महाराष्ट्र कॅरम सेंटर, सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट,दादर, मुंबई येथे आयोजित ५९ व्या महाराष्ट्र राज्य कॅरम स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातर्फे सहभागी होतील. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आनंद खरे, अभिषेक मोहिते, भरत खत्री, राजेंद्र प्रधान, यश अहिरे, नकुल चावरे, भूषण भटाटे, उत्कर्ष परदेशी आणि सहकारी यांनी परिश्रम घेतले.

निवड झालेल्या खेळाडूंची नांवे:

१८ वर्षे मुले : १ ) श्रीराज कुमावत २) प्रणव रामजेली ३) मयुरेश फुगारे ४) यश कानकाटे ५) अविजीत राय ६) कृष्णा तेलंगड, राखीव - ७) पार्थ शिंदे ८) पियुष धात्रक.

१८ वर्षे मुली : १) तनुजा गाडवे २)गौरी तेलंगड ३) दिशाली बालदवा ४)मेघा बिडे ५)दिपाली थोरात ६)दिया वाघमारे, राखीव - ७)वैभवी चिंताकिंदी ८)स्वरा अहिरे.

२१ वर्षे मुली - १) रसिका गुरुळे २) वेदांती पवार.

२१ वर्षे मुले -१) योगेश डुकरे

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande