फ्रान्सचे पंतप्रधान सेबास्टियन लेकोर्नू यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा
लंडन, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। फ्रान्समध्ये मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. पंतप्रधान सेबास्टियन लेकोर्नू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. फ्रान्सच्या राष्ट्रपती कार्यालयाने सेबास्टियन यांच्या राजीनाम्याची अधिकृत पुष्टी केली आहे. लेकॉर्नू यांनी केवळ एक
फ्रान्सचे पंतप्रधान सेबास्टियन लेकोर्नू


लंडन, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। फ्रान्समध्ये मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. पंतप्रधान सेबास्टियन लेकोर्नू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. फ्रान्सच्या राष्ट्रपती कार्यालयाने सेबास्टियन यांच्या राजीनाम्याची अधिकृत पुष्टी केली आहे. लेकॉर्नू यांनी केवळ एक दिवस आधीच त्यांच्या मंत्रिमंडळाची घोषणा केली होती आणि ते एका महिन्याहूनही कमी कालावधीसाठी या पदावर होते.

राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रों यांनी लेकोर्नू यांचा राजीनामा स्वीकारल्याचे राष्ट्रपती भवनाच्या एका निवेदनात सांगण्यात आले. लेकॉर्नू हे त्यांच्या पूर्वसूरी फ्रांस्वा बायरू यांच्या जागी आले होते आणि ते एका वर्षात फ्रान्सचे चौथे पंतप्रधान ठरले.

लेकॉर्नू यांच्या निर्णयांवर टीका झाली होती. त्यांनी माजी वित्तमंत्री ब्रुनो ले मायेर यांना पुन्हा संरक्षण मंत्रालयात आणल्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती. अन्य महत्त्वाच्या पदांमध्ये फारसे बदल करण्यात आले नव्हते. रूढीवादी ब्रुनो रिताइलो यांनी गृहमंत्री पद कायम राखले, ते पोलिस आणि अंतर्गत सुरक्षेचे प्रभारी आहेत. जीन-नोएल बारोत यांना परराष्ट्रमंत्री बनवण्यात आले.गेराल्ड डर्मॅनिन यांना न्याय मंत्रालयाचा कार्यभार देण्यात आला.

राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रों यांच्या विरोधकांनी या अचानक आलेल्या राजीनाम्याचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न केला आहे. डाव्या विचारसरणीच्या ‘फ्रान्स अनबोड’ पक्षाने आणि उजव्या विचारसरणीच्या ‘नेशनल रॅली’ पक्षाने मॅक्रों यांच्याकडे नव्या निवडणुका जाहीर करण्याची किंवा राजीनामा देण्याची मागणी केली आहे.

फ्रान्सच्या राजकारणात गेल्या काही काळापासून मोठ्या घडामोडी घडत आहेत, विशेषतः तेव्हापासून जेव्हा मॅक्रों यांनी मागील वर्षी अचानक निवडणुकांचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे संसदेमध्ये मोठा मतभेद आणि अस्थिरता निर्माण झाली. डाव्या व उजव्या विचारसरणीच्या खासदारांकडे मिळून 320 हून अधिक जागा आहेत. तर मध्यममार्गी आणि सहयोगी रूढिवादी गटांकडे केवळ 210 जागा आहेत.ही स्थिती मॅक्रों यांच्यासाठी मोठे आव्हान बनली आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande