ओसामा बिन लादेनच्या डोक्यात गोळी झाडणारे जवान अमेरिकन नेव्ही सील्सचे होते - ट्रम्प
वॉशिग्टन, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। इतिहास कधीही विसरणार नाही की अल कायदाचा प्रमुख नेता अतिरेकी ओसामा बिन लादेनच्या ठिकाणी हल्ला करून त्याच्या डोक्यात गोळी झाडणारे जवान अमेरिकन नेव्ही सील्सचे होते, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. ट्रम्
- ट्रम्प


वॉशिग्टन, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। इतिहास कधीही विसरणार नाही की अल कायदाचा प्रमुख नेता अतिरेकी ओसामा बिन लादेनच्या ठिकाणी हल्ला करून त्याच्या डोक्यात गोळी झाडणारे जवान अमेरिकन नेव्ही सील्सचे होते, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. ट्रम्प यांनी हेही सांगितले की 2001 मध्ये अल कायदाच्या अतिरेक्यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवर्सवर हल्ला करण्याच्या एक वर्ष आधीच त्यांनी लादेनबाबत इशारा दिला होता.

अमेरिकन नौदलाच्या 250व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने वर्जिनियाच्या नॉरफोक शहरात आयोजित विशेष समारंभात ट्रम्प म्हणाले, “इतिहास कधीही विसरणार नाही की हे नेव्ही सील्सचे जवान होते, ज्यांनी ओसामा बिन लादेनच्या ठिकाणी घुसून त्याच्या डोक्यात गोळी झाडली होती. हे लक्षात ठेवा.”

ट्रम्प म्हणाले की, त्यांनी 9/11 च्या हल्ल्याच्या एक वर्ष आधीच अधिकाऱ्यांना ओसामा बिन लादेनवर लक्ष ठेवायला सांगितले होते. ते पुढे म्हणाले, “कृपया हे लक्षात ठेवा मी वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला होण्याच्या एक वर्ष आधीच ओसामा बिन लादेनबद्दल लिहिलं होतं. मी म्हटलं होतं, ‘तुम्ही ओसामा बिन लादेनवर लक्ष ठेवा.’ मी एक वर्ष आधीच सांगितलं होतं की मी ओसामा नावाच्या एका व्यक्तीला पाहिलं आहे आणि तो मला आवडला नाही. मी सांगितलं होतं, त्याच्यावर लक्ष ठेवायला हवं.”

ट्रम्प पुढे म्हणाले, “पण त्यांनी लक्ष ठेवलं नाही. आणि एक वर्षानंतर त्याने वर्ल्ड ट्रेड सेंटर उडवलं. म्हणून मला थोडं तरी श्रेय द्यायला हवं, कारण कोणी दुसरा ते देणार नाही.”ट्रम्प म्हणाले की, “अमेरिकन नौदलानेच लादेनचा मृतदेह ‘यूएसएस कार्ल विन्सन’ या युद्धनौकेवरून समुद्रात फेकून दिला होता.”

मे 2011 मध्ये अमेरिकन नेव्ही सील्सच्या एका विशेष मोहिमेत ओसामा बिन लादेनला ठार करण्यात आलं होतं. तो पाकिस्तानमधील एबटाबाद या शहरात एका घरात लपून बसलेला होता. ही कारवाई तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात पार पडली होती.

अफगाणिस्तानमधून अमेरिकेच्या माघारीवर टीका करणारे ट्रम्प यांनी पुढे असंही म्हटलं, “अमेरिका अफगाणिस्तानात सहज विजय मिळवू शकला असता. आपण प्रत्येक युद्ध सहज जिंकू शकतो.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande