चिकलठाणा भागातील अन्नमित्र फाउंडेशनमध्ये पालकमंत्र्यांनी केले भोजन
छत्रपती संभाजीनगर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा भागातील अन्नमित्र फाउंडेशन (अगोदरचे इस्कॉन फूड रिलीफ फाउंडेशन) या ठिकाणी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी भेट देऊन तेथील संपूर्ण प्रक्रिया जाणून घेतली
अ


छत्रपती संभाजीनगर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा भागातील अन्नमित्र फाउंडेशन (अगोदरचे इस्कॉन फूड रिलीफ फाउंडेशन) या ठिकाणी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी भेट देऊन तेथील संपूर्ण प्रक्रिया जाणून घेतली. तसेच विद्यार्थ्यांसोबत भोजन घेतले.

या फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक शाळांमध्ये तसेच विविध ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी पौष्टिक व स्वच्छ भोजन सेवा दिली जाते.

अत्याधुनिक आणि विशाल अशा किचनमध्ये रोज हजारो मुलांसाठी स्वच्छतेच्या अत्युच्च निकषांनुसार अन्न तयार केले जाते हे पाहून मनापासून आनंद वाटला.

अन्नमित्र फाउंडेशनच्या सर्व स्वयंसेवकांचं मनःपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा. असेच निस्वार्थी कार्य सतत घडत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. असे पालकमंत्री म्हणाले.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande