पाथरीत तहसिलदारांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून दिव्यांगाची गांधीगीरी
परभणी, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। शेतकरी, महिलां, विधवा, श्रावणबाळ यांच्या विविध मागण्यांसाठी गेलेल्या नागरीकांना तहसील कार्यालयातील कर्मचार्‍यांनी विसंगत आणि उडवा उडवीची उत्तरे दिल्याचा आरोप करीत दिव्यांगांसह किसान सभेचे दिपक लिपने, शिवसेनेचे माजी पं.
पाथरीत तहसिलदारांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून दिव्यांगानी केली गांधीगीरी


परभणी, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। शेतकरी, महिलां, विधवा, श्रावणबाळ यांच्या विविध मागण्यांसाठी गेलेल्या नागरीकांना तहसील कार्यालयातील कर्मचार्‍यांनी विसंगत आणि उडवा उडवीची उत्तरे दिल्याचा आरोप करीत दिव्यांगांसह किसान सभेचे दिपक लिपने, शिवसेनेचे माजी पं. स. सदस्य शरद कोल्हे, प्रहारचे दिपक खुडे यांच्यासह संतप्त कार्यकर्त्यांनी शेतकरी, महिलांसह तहसिलदारांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालत गांधीगिरी केली.

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने 23 सप्टेबर रोजी विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन देत त्यात शेतकर्‍याची सरसकट कर्जमाफी मिळणे बाबत, शेतकर्‍यााना एकरी 50 हजार रुपये अनुदान द्यावे, 8-9 महिन्याचे दिव्यांग, विधवा व श्रावण बाळ यांचे मानधन स्थगित आहे ते द्यावे, दिव्यांग, विधवा व श्रावणबाळ या प्रस्तावा मध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्यां भरून प्रस्ताव मंजूर करावे, तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र जे आहेत त्यांना कालावधी देणे, एक वर्षापासून प्रस्ताव स्थगित नाहेत ते मिटिंग लावून मंजूर करणे,दिव्यांग अंत्योदय शिधापत्रिका देणे. या मागण्या बाबत निवेदन दिले होते. या मागण्या विषयी प्रतिसाद न मिळाल्यास 6 ऑक्टोबर पासुन बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्या अनुषंगाने सोमवार 6 ऑक्टोबर रोजी दिव्यांग, महिला, शेतकरी हे तहसीलदार यांना या विषयी विचारणा करण्यासाठी गेले असता तहसीलदार कार्यालयात नसल्याने इतर कर्मचार्‍यांना विचारणा केली असता तहसील कर्मचार्‍यांनी मद्यपानाच्या नशेत उडवा उडवीची उत्तरे दिल्याचा आरोप करत दिव्यांगांसह महिला, शेतकरी, किसान सभा, शिवसेना उबाठा च्या वतीने तहसीलदारांच्या खुर्चीला हार घालत गांधीगिरी करून निषेधाच्या घोषणा दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande